ट्विटरनं डिलीट केले १ लाख २५ हजार अकाऊंटस्!

मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरनं आत्तापर्यंत जवळपास १ लाख २५ हजार अकाऊंटस डिलीट केलेत. यातील बहुतांशी अकाऊंट हे दहशतवादी संघटना आयएसआयएसशी निगडीत आहेत.

Updated: Feb 6, 2016, 06:08 PM IST
ट्विटरनं डिलीट केले १ लाख २५ हजार अकाऊंटस्! title=

वॉशिंग्टन : मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरनं आत्तापर्यंत जवळपास १ लाख २५ हजार अकाऊंटस डिलीट केलेत. यातील बहुतांशी अकाऊंट हे दहशतवादी संघटना आयएसआयएसशी निगडीत आहेत.

या अगोदर २०१५ च्या मध्यातही ट्विटरनं काही अकाऊंटस डिलीट केले होते. शुक्रवारी एका ब्लॉगद्वारे ट्विटरनं या बातमीवर शिक्कामोर्तब केलंय. 

'ट्विटर'च्या यूझर्सनं केलेल्या तक्रारींची दखल घेत हे अकाऊंट अकार्यान्वित करण्यात आल्याचं ट्विटरकडून स्पष्ट करण्यात आलंय. 

उल्लेखनीय म्हणजे, सोशल मीडिया परदेशातून येणाऱ्या दहशतवादी कारवाया थांबविण्यासाठी चांगलीच अलर्ट आहे, असं रायटर्सनं नुकतंच म्हटलं होतं. तसंच ट्विटरकडून 'इसिस'सारख्या दहशतवादी संघटनांवर कारवाईचं पाऊल न उचलण्यात आल्यानं अनेक यूझर्स नाराज होते. हे लक्षात आल्यानंतर ट्विटरनं हे अकाऊंट डिलीट केलेत.