ट्रू-कॉलरने लाँच केले नवे 'अॅव्हेलिबिलीटी' फीचर

मुंबई : कॉलर आयडेंटिटी अॅप ट्रू-कॉलरने एक नवी अपडेट लाँच केलीये

Updated: Mar 9, 2016, 07:44 PM IST
ट्रू-कॉलरने लाँच केले नवे 'अॅव्हेलिबिलीटी' फीचर  title=

मुंबई : कॉलर आयडेंटिटी अॅप ट्रू-कॉलरने एक नवी अपडेट लाँच केलीये. ज्यात या अॅपविषयी अनेक नवे फीचर्स आहेत. यातील एका नव्या फीचरनुसार आता तुम्ही ज्या व्यक्तीला कॉल करत आहात ती व्यक्ती तुमच्याशी बोलण्यासाठी उपलब्ध आहे की नाही हे सांगता येईल. 

हे नवीन फीचर तुमच्या मोबाईलमधील कॅलेंडर अॅक्सेस करुन तुमच्याविषयीची माहिती जमा करते. यानंतर दुसऱ्या यूजरला या अॅपवर कॉन्टॅक्टच्या माध्यमातून तुमचे स्टेटस सांगितले जाते. ही चॅटसारखी विशिष्ट सोय असेल ज्यात ऑनलाईन यूजर्ससाठी हिरव्या रंगाचा ठिपका दिसेल. काही व्यक्तींसाठी मात्र ही डोकेदुखी ठरू शकते. कारण, खरंच कोणी बोलण्यासाठी व्यस्त आहे की कोण खोटं बोलतंय हे इतरांना समजण्याची यात शक्यता निर्माण होऊ शकते. 

जेव्हा कॉल करणाऱ्या आणि कॉल ज्याला केला आहे या दोन्ही व्यक्तींच्या मोबाईलमध्ये हे अॅप असेल तरच या सेवेचा वापर करता येईल. या नव्या अपडेटमध्ये स्मार्ट कॉल हिस्टरी आणि अॅव्हेलिबिलीटीसोबतच स्मार्ट डायलर हे एक विशेष फीचर देण्यात आले आहे. यासाठी खरं तर कंपनीने एक वेगळे अॅप आणले होते. पण, या नव्या अपडेटनंतर ट्रू कॉलरमध्येच हे फीचर्स उपलब्ध होतील. 

मंगळवारी हे अॅप सर्वांसाठी उपलब्ध होण्यास सुरुवात होईल. आता या नव्या अपडेटनंतर ट्रू कॉलरवरुन कॉल करणेही शक्य होणार आहे. याआधी कॉल करायचा असल्यास तुम्हाला अँड्रॉइड डायलरवर जावे लागत असे. या अपडेटमध्ये मात्र दोन्ही पर्याय देण्यात आले आहेत.