तुम्हाला आवडणारी मुलगी सिंगल आहे की नाही हे कसे ओळखाल...घ्य़ा जाणून

प्रेम ही एक सुखद भावना आहे. अनेकदा आपल्याला एखादी व्यक्ती आवडत असते. आपले तिच्यावर प्रेम जडते. मात्र ती सिंगल आहे की नाही हे माहीत नसते. असे त्या व्यक्तीला विचारणेही चुकीचे असते. तुम्हाला आवडणारी व्यक्ती सिंगल आहे की नाही हे ओळखायचे असेल तर जाणून घ्या या पद्धती

Updated: Sep 18, 2016, 08:19 PM IST
तुम्हाला आवडणारी मुलगी सिंगल आहे की नाही हे कसे ओळखाल...घ्य़ा जाणून title=

मुंबई : प्रेम ही एक सुखद भावना आहे. अनेकदा आपल्याला एखादी व्यक्ती आवडत असते. आपले तिच्यावर प्रेम जडते. मात्र ती सिंगल आहे की नाही हे माहीत नसते. असे त्या व्यक्तीला विचारणेही चुकीचे असते. तुम्हाला आवडणारी व्यक्ती सिंगल आहे की नाही हे ओळखायचे असेल तर जाणून घ्या या पद्धती

1. प्रत्येक माणसाची बॉडीलॅग्वेज वेगळी असते. व्यक्तीच्या बॉडीलॅग्वेजवरुन ती व्यक्ती कशी आहे हे ओळखता येते. तुम्हाला आवडणाऱ्या व्यक्तीची बॉडी लॅग्वेज जाणून घेण्याचा प्रयत्न करा.

2. सिंगल असणाऱ्या मुली आपला अधिक वेळ मैत्रिणींसोबत घालवतात. तुम्हाला आवडणारी तीही तिच्या मैत्रिणींसोबत अधिक वेळ घालवत असेल तर समजून जा की ती सिंगल आहे.

3. ज्या मुली सिंगल नसतात त्या इतर मुलांशी जास्त फ्रेंडली नसतात. त्यामुळे तुम्हाला आवडणारी मुलगी खुलेपणाने मुलांशी बोलत असेल तर ती कदाचित सिंगल आहे.