जगातील सर्वात गरीब देश

जगात विकसित, विकसनशील आणि गरीब असे तीन प्रकारचे देश आहेत. आर्थिक सुबत्ता असलेले देश तर सर्वांनाच माहीत आहे मात्र जगात असेही काही देश आहेत जे सर्वात गरीब आहेत. त्या देशांत मुलभूत गरजांचीही वानवा आहे. आफ्रिका खंडातील हे असे पाच देश आहेत जे सर्वात गरीब आहेत. ज्याप्रमाणे गेल्या काही वर्षांमध्ये आफ्रिकेत प्रगती होत असली तरी मात्र तेथील अनेक देशांमध्ये गरिबीचे प्रमाण अधिक आहे. 

Updated: Dec 6, 2015, 04:17 PM IST
जगातील सर्वात गरीब देश title=

नवी दिल्ली : जगात विकसित, विकसनशील आणि गरीब असे तीन प्रकारचे देश आहेत. आर्थिक सुबत्ता असलेले देश तर सर्वांनाच माहीत आहे मात्र जगात असेही काही देश आहेत जे सर्वात गरीब आहेत. त्या देशांत मुलभूत गरजांचीही वानवा आहे. आफ्रिका खंडातील हे असे पाच देश आहेत जे सर्वात गरीब आहेत. ज्याप्रमाणे गेल्या काही वर्षांमध्ये आफ्रिकेत प्रगती होत असली तरी मात्र तेथील अनेक देशांमध्ये गरिबीचे प्रमाण अधिक आहे. 

एरिट्रिया : आफ्रिका खंडातील हा लहानसा देश आहे. अस्मारा ही या देशाची राजधानी आहे. या देशाची लोकसंख्या आहे केवळ सहा दशलक्ष. या देशाचा वार्षिक जीडीपी आहे केवळ ७३५ डॉलर पर कॅपिटा. 

बुरुंडी : आफ्रिकेतील गरीब देशांपैकी एक असा बुरुंडी. नागरिक आणि आदिवासी यांच्यात मोठा संघर्ष या देशात सुरु आहे. याच्या परिणामामुळे या देशाचा विकास होऊ शकलेला नाही. देशातील तब्बल ८० टक्के जनता गरिबीखाली आहे. एचआयव्ही संक्रमण, भ्रष्टाचार आणि पक्षापक्षांतील संघर्ष यामुळे हा देश विकासापासून वंचित राहिला आहे

झिम्बाब्वे : झिम्बाब्वेही आफ्रिका खंडातला आणखी एक गरीब देश आहे. हरारे ही यादेशाची राजधानी आहे. या देशाचा वार्षिक जीडीपी केवळ ४८७ डॉलर पर कॅपिटा इतका आहे.

लिबेरिया : लिबेरिया हा देश गरीब देशांपैकी एक देश आहे. या देशातील ८५ टक्के जनताही अद्यापही दारिद्र्य रेषेखाली आहे. याचा जीडीपी ४६५ डॉलर पर कॅपिटा इतका आहे

काँगो : आफ्रिकेतील सर्वात गरीब देशांच्या यादीत काँगो देशाचा पहिला क्रमांक लागतो. याचा देशाचा जीडीपी ३४८ डॉलर पर कॅपिटा आहे. स्वातंत्र्यापासूनच आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेला काँगो यादवी, अराजकता, दोन राजकीय गटांमधील चकमकी इत्यादी कारणांस्तव आजही अशांत व अस्थिर आहे. शेती व खनिज तेलावर अवलंबून असून खाणकाम हा देखील येथील प्रमुख उद्योग आहे

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.