मुंबई: जर आपण स्मार्टफोनवर चॅटिंगसाठी गूगलच्या हँगआऊटचा वापर करत असाल तर सावध व्हा! कारण गूगल स्वत: सांगितलंय की, या अॅपवर केलं गेलेलं चॅटिंग हॅक होऊ शकतं.
गूगलनुसार हा चॅट प्रोग्राम चॅटिंगसाठी एनक्रिप्शन तंत्रज्ञानाचा उपयोग करत नाही. म्हणून याला हॅक करणं अधिक सोपं आहे. एवढंच नव्हे तर ऑफ द रिकॉर्ड चॅट सुद्धा हॅकर्सच्या निशाण्यावर आहे. म्हणून याचा वापर करतांना सावध राहण्याची गरज आहे.
गूगलनं हे सुद्धा सांगितलंय की, जर कोणत्या देशातील सरकार त्यांना यूजर्सची हेरगिरी करायला किंवा चॅट रेकॉर्ड दाखविण्यासाठी सांगेल. तर ते तसं करू शकतात.
तर दुसरीकडे याप्रकरणी ब्लॅकबेरीचं बीबीएम मॅसेंजर किंवा अॅपलचं फेसटाइम सर्वाधिक सुरक्षित अॅप आहे. म्हणून जर आपण चॅटिंगवर अशा काही वादग्रस्त बोलत असाल तर हे अॅप वापरतांना सावध राहा.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.