'टीसीएस'कडून कर्मचाऱ्यांना २ हजार ६२८ कोटी बोनस

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच टीसीएसने आपल्या कर्मचाऱ्यांना २ हजार ६२८ कोटी रूपयांचा एक रकमी बोनस द्यायचं ठरवलं आहे. कंपनीला बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजला लिस्टेड होऊन १० वर्ष झाले आहेत.

Updated: Apr 16, 2015, 07:07 PM IST
'टीसीएस'कडून कर्मचाऱ्यांना २  हजार ६२८ कोटी बोनस title=

मुंबई : टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच टीसीएसने आपल्या कर्मचाऱ्यांना २ हजार ६२८ कोटी रूपयांचा एक रकमी बोनस द्यायचं ठरवलं आहे. कंपनीला बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजला लिस्टेड होऊन १० वर्ष झाले आहेत.

जगभरात टीसीएसचे ३ लाख १९ हजार कर्मचारी आहेत, ज्या कर्मचाऱ्याला कंपनीत सेवा करतांना कमीत कमी १ वर्ष पूर्ण झालं असेल, अशा कर्मचाऱ्यांना या बोनसचा लाभ मिळणार आहे, टीसीएसने ही माहिती दिली आहे. टीसीएसच्या कर्मचाऱ्यांना एका आठवड्याच्या पगाराएवढा बोनस मिळणार आहे. कंपनीत जेवढी वर्ष काम केलं आहे, तेवढ्या आठवड्यांचा बोनस कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.