नवी दिल्ली : साप असं म्हणताच अनेकांचे कान टवकारतील आणि जर अचानकपणे आपल्या समोर साप आल्यास तर भल्या भल्यांना दरदरुन घाम फुटतो. मात्र समजा साप तुमच्यासमोर आहे मात्र तरीही तुम्ही त्याला ओळखू शकत नसाल तेव्हा काय होईल.
वरील फोटो जाणीवपूर्वक पाहा. तुम्ही म्हणाल त्या फोटोमध्ये वेगळं काय आहे केवळ झाडाचे खोड दिसत आहे. मात्र तुम्हाला असे सांगितले की या झाडावर एक दुर्लभ प्रजातीचा साप आहे तर.... सुरुवातीला तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही. मात्र तुम्ही त्या फोटोकडे लक्षपूर्वक पाहाल तर तुम्हाला तेथे साप दिसेल.
स्टीफन बँडेड या प्रजातीचा हा साप आहे. ज्याच रंग झाडाच्या खोडासारखा असतो. या अनोख्या फोटोला लीन कुक यांनी फेसबुकवर शेअर केलाय आणि ३० सेकंदात साप शोधण्यास सांगितलेय.