स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये २०६२ जागांसाठी भरती

स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये प्रशिक्षणार्थी अधिकारी पदाची भरती करण्यात येणार आहे. २०६२ जागांसाठी ही भरती होत आहे.

Updated: Apr 14, 2015, 11:43 AM IST
स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये २०६२ जागांसाठी भरती title=

मुंबई : स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये प्रशिक्षणार्थी अधिकारी पदाची भरती करण्यात येणार आहे. २०६२ जागांसाठी ही भरती होत आहे.

उमेदवार ऑनलाईन अर्ज १३ एप्रिल ते २ मेपर्यंत भरु शकणार आहे. या पदासाठी जूनमध्ये एक पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे. दहावी भरती २०१५साठी एकूण संख्या २०६२ असून वय मर्यादा २१ वर्षपेक्षा कमी आणि २८ वर्षांपेक्षा जास्त असून नये, अशी अट आहे. उमेदवाराचे वय १ एप्रिल २०१५ पर्यंत ग्राह्य धरण्यात येणार आहे. 

पात्रता : उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. निवड प्रक्रिया: निवड चाचणी आधारित असेल. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. १०० मार्कांची पूर्व चाचणी परीक्षा होणार आहे. मुख्य परीक्षा आणि उमेदवारांची गट चर्चा आणि मुलाखत होणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.