मुंबई: मोबाईल कंपनी सोनीनं तरुणांमध्ये सेल्फीसाठी असलेली क्रेझ पाहून खास सेल्फी स्मार्टफोन लॉन्च केलाय. सोनीनं डबल सिमचा Xperia c3 हँडसेट सादर केलाय, ज्याची किंमत 23,990 रुपये आहेत.
या हँडसेटचं वैशिष्ट्य म्हणजे याचा 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. ज्याद्वारे मस्त सेल्फी काढला जावू शकतो. हा हँडसेट 1 सप्टेंबरपासून बाजारात विक्रीला येणार आहे.
सोनीनं सेल्फी सेल्फी टॅग शिवाय या फोनमध्ये चार अॅटोमॅटिक मोड सुद्धा जोडले आहेत जे फ्रंट कॅमेऱ्याच्या फोटोंना अधिक सुंदर बनवतं. फोनच्या फ्रंट कॅमेऱ्यात सॉफ्ट LED फ्लॅश लाइट सुद्धा आहे. फोनमध्ये काढलेली सेल्फी चांगल्या प्रकारे प्रोसेस करू शकतो, त्यासाठी सोनीनं फोनमध्ये Pro Selfie Cam आणि प्रोटरेट री टच अॅप पण टाकलेला आहे.
या फोनमध्ये 8 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आहे. फोनचं स्क्रीन 5.5 इंच आहे, ज्याचं रिझॉल्यूशन 720 पिक्सेल आहे. फोनमध्ये 8 जीबी इंटरनल मेमरी आणि 1 जीबी रॅम आहे. फोन क्वॉड कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसरवर 1.2 गीगाहर्त्झवर चालतं. सोनीचा हा नवा सेल्फी फोन अँड्रॉईड 4.4 किटकॅटवर चालतो.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.