आमिरच्या प्रकरणावर अखेर स्नॅपडीलचं स्पष्टीकरण

अभिनेता आमिर खानच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर ऑनलाईन शॉपिंग कंपनी स्नॅपडीलने स्पष्टीकरण दिलं आहे. 

Updated: Nov 25, 2015, 04:56 PM IST
आमिरच्या प्रकरणावर अखेर स्नॅपडीलचं स्पष्टीकरण title=

मुंबई : अभिनेता आमिर खानच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर ऑनलाईन शॉपिंग कंपनी स्नॅपडीलने स्पष्टीकरण दिलं आहे. 

कारण आमिरवर वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप झाल्यानंतर, स्नॅपडीलचे अॅप डाऊनलोड झटपट कमी होत असल्याचं सांगण्यात येत होतं.

आमिर खानने एका कार्यक्रमात आपल्या पत्नीने देश सोडण्याचा विचार आपल्याला बोलून दाखवला होता, असं आमिर खानने म्हटलं होतं, त्यानंतर आमिर खान विरोधात सोशल मीडियात जोरदार टीका होत आहे.

यानंतर स्नॅपडीलचे अॅप डाऊनलोडिंग कमी होत असल्याचं सांगण्यात येत होतं, यावर स्नॅपडीलने बोलतांना म्हटलं आहे. 

आमिर खानचा वाद सुरू असला तरी आमिर खान आमच्या बॅण्ड अँबेसेडर कायम राहणार आहे. स्नॅपडील ही भारतीय कंपनी आहे. या कंपनीला उंचीवर नेण्यासाठी हजारो भारतीयांचं परिश्रम आहे.

आम्हाला या माध्यमातून आणखी दहा लाख उद्योजक बनवण्याचं टार्गेट पूर्ण करायचं असल्याचं स्नॅपडीलने म्हटलं आहे. स्नॅपडीलच्या व्यवसायावर परिणाम झाल्याचं अजून तरी समोर आलेलं नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.