'तीन ऋतू' संकल्पना मोडीत निघतेय?

हिवाळा, उन्हाळ्यात गारांसह अवकाळी पाऊस... गेल्या शंभर वर्षांत जळगाव  जिल्हात पहिल्यांदाच मार्चमध्ये जास्त पावसाची नोंद... मार्चमध्ये पाऊस पडण्याचं प्रमाण इतकं का वाढलंय? यांसह अनेक  प्रश्न महाराष्ट्रातील  जनतेच्या  मनात निर्माण  झालेत. 

Updated: Apr 1, 2015, 12:50 PM IST
'तीन ऋतू' संकल्पना मोडीत निघतेय? title=

मुंबई : हिवाळा, उन्हाळ्यात गारांसह अवकाळी पाऊस... गेल्या शंभर वर्षांत जळगाव  जिल्हात पहिल्यांदाच मार्चमध्ये जास्त पावसाची नोंद... मार्चमध्ये पाऊस पडण्याचं प्रमाण इतकं का वाढलंय? यांसह अनेक  प्रश्न महाराष्ट्रातील  जनतेच्या  मनात निर्माण  झालेत. 

गेल्या शंभर वर्षांत जळगाव जिल्ह्यात पहिल्यांदाच मार्चमध्ये ४८.३ मिली मीटर पावसाची नोंद झालीय. विशेष म्हणजे यापूर्वी महाराष्ट्रात १९१५ साली सर्वाधिक पाऊस मार्च महिन्यात परभणीत १३२ मिलिमीटर झाला होता. मार्च महिन्यात बहुतेक गारांसह पाऊस पडतो; पण यंदा गारा, वादळ आणि मुसळधार पाऊस असा संगम झाल्याने मोठे नुकसान झाले. 

यापूर्वीचा  इतिहास  पाहिला तर मार्चमध्ये नाशिकमध्ये १९७९ साली ४२.०८ मिलीमीटर तर परभणीत १९१५ साली १३२.०६ मिलीमीटर पाऊस नोंद होती.

यंदा मार्चमध्ये सर्वाधिक कुठं झाला ते पाहूयात...  

  • अहमदनगर - ६९.९ मिमी 

  • जळगाव - ४८.३ मिमी 

  • औरंगाबाद - ४३.३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.

सातत्यानं हवामान बदल; पश्चिमी वारे आणि द्रोणीय स्थिती अशी शास्त्रीय  कारणं यामागे असली तरी जागतिक पातळीवर वातावरणात बदल होतात, हेच लक्षात  येतं. मार्च, महिन्यात पाऊस पडण्याचे प्रमाण वाढत असल्याचं दिसून  येतंय.

तीन ऋतू ही सर्वसाधारण संकल्पना आता मोडीत निघतेय. पाऊस सातत्यानं  स्थळ आणि काळ बदलत चाललेलाय. यामुळेच, ग्लोबल वॉर्मिंगचे धोके लक्षात घेऊन पर्यावरणाची काळजी आपण घेतलीच पाहिजे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.