स्मार्टफोनची बॅटरी वाचवण्यासाठी काही सोप्या टीप्स...

स्मार्टफोनच्या बॅटरीनं ऐनवेळी धोका देणं... ही गोष्ट काही आता नवी राहिली नाही... पण, मोबाईलच्या योग्य वापर करून हा त्रास टाळला जाऊ शकतो आणि मोबाईल बॅटरीची लाईफही वाढते. 

Updated: Jun 10, 2015, 06:14 PM IST
स्मार्टफोनची बॅटरी वाचवण्यासाठी काही सोप्या टीप्स... title=

मुंबई : स्मार्टफोनच्या बॅटरीनं ऐनवेळी धोका देणं... ही गोष्ट काही आता नवी राहिली नाही... पण, मोबाईलच्या योग्य वापर करून हा त्रास टाळला जाऊ शकतो आणि मोबाईल बॅटरीची लाईफही वाढते. 

- वाय-फाय, ब्लूटूथ आणि जीपीएस या गोष्टींची तुम्हाला नक्कीच 24 तास गरज नसते. त्यामुळे या सुविधा जेव्हा गरज नसेल तेव्हा बंद करा. त्यामुळे बॅटरीवर चांगलाच फरक जाणवतो. 

- बॅकग्राऊंडमध्ये अनेक अॅप्स सुरू राहतात. तेही बॅटरी खातंच असतात. या अॅप्सची संख्या जितकी कमी तेवढं चांगलंच.

- लाईव्ह वॉलपेपर किंवा स्क्रीनसेवरमुळेही बॅटरी खर्ची पडते. 

- स्क्रीनचा ब्राइटनेस ऑटोमॅटिक मोडवर न ठेवत तो स्वत: सेट करा. स्क्रीन जितकी कमी ब्राईट तितका बॅटरीचा कमी वापर, ही गोष्ट लक्षात ठेवा.

- जर तुमच्या मोबाईलमध्ये बॅटरी सेव्हिंगचा मोड असेल तर त्याचा वापर नक्की करा. त्यामुळे, तुमची बॅटरी कमी झाल्यास तुमचा 'स्मार्ट' असलेला फोन गैरवापरातील अॅप्स फोन स्वत:च बंद करून टाकतो.

- सर्वात जास्त बॅटरी कोणत्या अॅपसाठी खर्च होते, हे काही दिवसांच्या अंतरानं जरूर चेक करत राहा. 

या सर्व उपायांमुळे तुमच्या बॅटरीचं आयुष्य नक्कीच वाढेल... पण, यामुळेही काही फरक पडत नसेल तर बाजारातून बॅटरी एक्स्टेंडर किंवा पॉवर बँक जवळ बाळगा... जेणेकरून ऐनवेळी तुमचा स्मार्टफोन तुम्हाला धोका देणार नाही.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.