टोरंटो : जगातील सर्वात मोठ्या एलीव्हेटर तयार करणाऱ्या एका कॅनेडियन कंपनीला, स्पेस एलीव्हेटर तयार करण्याचं पेटंट मिळालं आहे. एलीव्हेटर, दूबईतील जगात सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफापेक्षा २० पट उंच असणार आहे. या एलीव्हेटरच्य़ा एका टावरवरून अंतराळ यानाचं प्रक्षेपणही करता येणार आहे.
ओंटेरियावर आधारीत असलेल्या थोठ टॅक्नॉलॉजीने अंतराळात एलिव्हेटर तयार करण्याची एक योजना आखली आहे. डेली मेलने दिलेल्या बातमीनुसार, या एलीव्हेटरमुळे मोठ्या प्रमाणात इंधन आणि पैशांची बचत होणार आहे.
रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार एक फ्रीस्टँडिंग टावर बनवला, जमिनीपासून हा टावर २० किलो मीटर उंच असणार आहे.
अंतराळात प्रक्षेपण करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे, प्लॅटफॉर्म किंवा पॉड तयार करणे असेल, ज्यामुळे वजनाने जड असणाऱ्या यानांचं यशस्वी प्रक्षेपण करता येईल. शास्त्रीय दृष्टीकोन वाढवणे, शोध, पर्यटनालाही यामुळे चालना मिळणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.