सॅमसंगचा जगातील सर्वात स्लिम कॅमेरा

 सॅमसंगने जगातील सर्वात पातळ म्हणजे स्लिम आणि हलका स्मार्ट कॅमेरा NX मिनी लॉन्च केला आहे. या कॅमेऱ्याचा लेन्स बदलता येतो हे याचे खास वैशिष्ट्य आहे. कॅमेऱ्यात २० मेगापिक्सल  बीएसआय-सीएमओएस सेंसर आहे. जो कमी प्रकाशात स्वच्छ फोटो घेऊ शकतो. 

Updated: Aug 28, 2014, 10:02 AM IST
सॅमसंगचा जगातील सर्वात स्लिम कॅमेरा title=

मुंबई :  सॅमसंगने जगातील सर्वात पातळ म्हणजे स्लिम आणि हलका स्मार्ट कॅमेरा NX मिनी लॉन्च केला आहे. या कॅमेऱ्याचा लेन्स बदलता येतो हे याचे खास वैशिष्ट्य आहे. कॅमेऱ्यात २० मेगापिक्सल  बीएसआय-सीएमओएस सेंसर आहे. जो कमी प्रकाशात स्वच्छ फोटो घेऊ शकतो. 

NX मिनीत एनएफसी आणि वाय-फाय आहे. यासाठी सैमसंगने दोन लेन्सही आणले आहेत.  हे लेन्स दिसायला छोटे आणि हलके आहे, पण याची पिक्चर क्वॉलिटी खूपच चांगली आहे. यात 3 इंचाचा एलसीडी फिल्प अप टच पॅनल आहे. हे पॅनल 180 डिग्रीपर्यंत फिरू शकते. त्यामुळे सेल्फी घेणे सोपे जाते. 

यात इतर अनेक फीचर आहेत, त्यात 30 फ्रेम प्रति सेकंडच्या स्पीडने 1080p फूल व्हिडिओ रिकॉर्डिंग आहे. विंक शॉट, प्रति सेकंड 6 फ्रेम घेणारा कन्टिनुअस शॉट मोड, ऑटो बॅकअप, ग्रुप शेअर, फोटो बीम. कंपनी पहिल्या ग्राहकांना 1,999 रुपयांचा बॅकपॅक  देखील देत आहे.  हा कॅमेरा ऑनलाइन रिटेलर अॅमेझॉनवर उपलब्ध आहे.

SAMSUNG-NX MINI चे वैशिष्ट्ये
लेन्स- NX-M 9मिमी F3 ED, NX-M9-27 मिमी F3.5-5.6 ED OIs
वजन- 196 ग्रॅम
कॅमरा- 20 मेगापिक्सल
जाडी- 22.5 mm lcd फिलअप टच पॅनल
रिझूल्यूशन- 320x480
बॅटरी- 2330 एमएच
किंमत- 9 mm- 22,990 रुपये
9.27 mm- 27,490 रुपये
मेमरी-16 जीबी

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.