सॅमसंगचा 'गॅलक्सी ग्रॅंड Z' गुपचुपपणे बाजारात!

कोरीयन कंपनी सॅमसंगनं आपला ग्रॅंड फॅमिलीतला एक नवीन स्मार्टफोन गुपचुपपणे बाजारात उतरवला आहे.

Updated: Apr 15, 2014, 12:10 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
कोरीयन कंपनी सॅमसंगनं आपला ग्रॅंड फॅमिलीतला एक नवीन स्मार्टफोन गुपचुपपणे बाजारात उतरवला आहे. सॅमसंग `गॅलक्सी ग्रॅन्ड z` हा स्मार्टफोन बाजारात १८,४९९ रुपये किंमतीला मिळत आहे. हा स्मार्टफोन ड्युअल सिम, ड्युअल कोर आणि एन्ड्रॉयड ४.१ वर आधारीत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कंपनीनं हा स्मार्टफोन आपल्या वेबसाईटवर टाकला नाही. पण हा स्मार्टफोन `द मोबाइल स्टोर`वर उपलब्ध आहे.
या स्मार्टफोनची स्क्रीन ५ इंच आहे. तसंच रिजॉल्यूशन ८००x४८० पिक्सल आहे. हा फोन १.२ जीएचजेड ड्युअल कोर प्रॉसेसरनं चालतो. यात १ जीबी रॅम आणि ८ जीबी इंटरनल स्टोरेड क्षमता आहे. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये ६४ जीबी एक्सटर्नल कार्ड सपोर्ट आहे.
या हॅन्डसेटचे वजन १६१ ग्रॅम आहे. या हॅन्डसेटची जाडी ९.६ मिमी आहे. यात ८ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे आणि पुढे २ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. या कॅमेरातून फुल एचडी व्हिडियो रेकॉर्डिंग होऊ शकते.
यात इतर फिचर्स देखील आहेत. यामध्ये ३जी (२१ एमबीपीएस), वायफाय, मायक्रो यूएसबी, जीपीएस, ३.५ एमएम ऑडिओ जॅक, ब्लू-टूथ ४.० याशिवाय एक्सिलरोमीटर आणि मॅग्नेटिक सेंसर देखील आहे. याची बॅटरी २१०० एमएएच इतकी आहे, जी ३जी नेटवर्क वर १० तासापर्यंत टॉक टाइम देते. हा स्मार्टफोन ऑनलाईन उपलब्ध आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.