सॅमसंगनं लॉन्च केला गॅलेक्सी कोअर पाइम 4G,किंमत १० हजारहून कमी

कोरियन मोबाईल कंपनी सॅमसंगनं लपून लपून भारतामध्ये आपला नवा 4G स्मार्टफोन मार्केटमध्ये लॉन्च केलाय. कंपनी नव्या सॅमसंग गॅलेक्सी कोअर प्राइम 4G मार्चमध्ये लॉन्च करणार होते पण आता लॉन्च केलाय.

Updated: Jun 3, 2015, 12:45 PM IST
सॅमसंगनं लॉन्च केला गॅलेक्सी कोअर पाइम 4G,किंमत १० हजारहून कमी  title=

मुंबई: कोरियन मोबाईल कंपनी सॅमसंगनं लपून लपून भारतामध्ये आपला नवा 4G स्मार्टफोन मार्केटमध्ये लॉन्च केलाय. कंपनी नव्या सॅमसंग गॅलेक्सी कोअर प्राइम 4G मार्चमध्ये लॉन्च करणार होते पण आता लॉन्च केलाय.

मिळालेल्या बातमीनुसार या फोनची किंमत ९९९९ रुपये असेल. सॅमसंग गॅलेक्सी कोअर पाइममध्ये एअरटेलचा ३जीबीचा 4G डेटा फ्री असेल. सोबतच तीन महिन्यांसाठी हंगामाचं सब्सक्रिप्शन दिलं जाईल. हा फोन कंपनीच्या इंडिया ई-स्टोअर वर लिस्ट केलेला नव्हता.

सॅमसंग गॅलक्सी कोअर प्राइम 4जीचे खास फीचर्स:
 
> 4.5 इंच डिस्प्ले, 480x800 पिक्सल रेझ्युलेशन
 
> ड्यूअल सिम सपोर्ट
 
> 4जी नेटवर्क सपोर्ट
 
> ऑपरेटिंग सिस्टम अँड्रॉईड 4.4 किटकॅट
 
> 1.2 GHz क्वॉड कोअर प्रोसेसर
 
> 1 जीबी रॅम, 8 जीबी इंटरनल मेमरी आणि मायक्रोकार्डद्वार 64 जीबीपर्यंत रॅम वाढवू शकतो
 
> 5 मेगापिक्सल एलईडी फ्लॅश रिअर कॅमेरा, 2 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
 
> 2000 mAh बॅटरी क्षमता

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.