वॉशिंग्टन : मायक्रोसॉफ्टची ऑपरेटिंग सिस्टीम 'विंडोज टेन‘ विनामूल्य उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत संपली आहे. विंडोज १० ऑपरेटिंग सिस्टिम २९ जूनला ओएस ग्राहकांना वापरासाठी उपलब्ध होईल, असे मायक्रोसॉफ्टने स्पष्ट केलेय. सध्याचे विंडोजचे अद्ययावत व्हर्जन वापरणाऱ्यांना नवीन ओएस मोफत अपग्रेड करता येणार आहे.
टच फ्रेंडली विंडोज १०, हे याचे वैशिष्ट्य आहे.. मायक्रोसॉफ्टने काही महिन्यांपूर्वी विंडोज १० लवकरच लॉंच करत असल्याचे जाहीर केले होते. आता २९ जूनपासून ग्राहकांना विंडोज १० वापरायला मिळणार आहे. याआधीच्या ऑपरेटिंग सिस्टिममध्ये नसलेला स्टार्टचा पर्यायही या व्हर्जनमध्ये ठेवण्यात आला आहे.
सध्याचे विंडोज ७ आणि विंडोज ८.१ वापरणाऱ्यांनाही मायक्रोसॉफ्टने मोफत अपग्रेडेशनचा पर्याय दिला आहे. सुरुवातीला विंडोज १० पीसी आणि टॅबलेटसाठीच वापरता येणार आहे. त्यानंतर स्मार्ट फोनसाठी हे व्हर्जन उपलब्ध करण्यात येणार आहे. पीसी, टॅबलेटस् आणि स्मार्ट फोनमध्येही हा पर्याय ठेवण्यात आला आहे.
कसे कराल विंडोज १० अपग्रेड ?
विंडोज ७ आणि विंडोज ८.१ व्हर्जन वापरणाऱ्यांना एका ई-मेलद्वारे अपग्रेडेशन करता येणार आहे. त्यासाठी किमान ३ जीबीची मेमरी पीसी किंवा टॅबलेटमध्ये असणे गरजेचे आहे. पीसीच्या टास्कबारमध्ये रिझर्व्ह युअर फ्री अपग्रेडचा पर्याय आल्यानंतर विंडोज १० अपडेट करता येईल.
विंडोज १०मध्ये नव्या सुविधांसह विंडोज एज ब्राऊजर, चेहरा ओळखण्याची सुविधा, बोटाच्या ठशांद्वारे लॉगीनची सुविधा यासह फोटो, नकाशे, मेल, कॅलेंडर आदींसाठी विविध विंडोज अॅप्सही असणार आहेत. तर "विंडोज प्रो‘ एडिशनही व्यावसायिक वापरासाठी उपयोगी ठरणार असल्याचे मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.