सॅमसंगनं लॉन्च केला सर्वात स्लिम स्मार्टफोन गॅलेक्सी A8

अखेर सॅमसंगनं आपला सर्वात स्लिम स्मार्टफोन गॅलेक्सी A8 लॉन्च केलाय. गॅलेक्सी A7ला मिळालेल्या जबरदस्त रिस्पॉन्सनंतर कोरिअन कंपनीनं आपला स्लिमेस्ट (5.9mm) स्मार्टफोन लॉन्च केलाय. या फोनची किंमत ३२००० रुपये ठेवलीय. 

Updated: Aug 3, 2015, 03:07 PM IST
सॅमसंगनं लॉन्च केला सर्वात स्लिम स्मार्टफोन गॅलेक्सी A8  title=

मुंबई: अखेर सॅमसंगनं आपला सर्वात स्लिम स्मार्टफोन गॅलेक्सी A8 लॉन्च केलाय. गॅलेक्सी A7ला मिळालेल्या जबरदस्त रिस्पॉन्सनंतर कोरिअन कंपनीनं आपला स्लिमेस्ट (5.9mm) स्मार्टफोन लॉन्च केलाय. या फोनची किंमत ३२००० रुपये ठेवलीय. 

हा आतापर्यंतचा सर्वात स्लिम स्मार्टफोन नाहीय, यापूर्वी जिओनी Elife S7 (5.5mm) आणि ओपो R5 (4.85mm) सारखे स्लिम स्मार्टफोन बाजारात आलेले आहेत. पण सॅमसंगचा हा सर्वात स्लिम स्मार्टफोन आहे. यावेळी हा फोन पांढरा, काळा, गोल्डन रंगांमध्ये उपलब्ध आबे. हा फोन चीनमधील एका इव्हेंटमध्ये लॉन्च करण्यात आला. 

सॅमसंग गॅलेक्सी A8 चे फीचर्स-
- ५.७ इंचाचा सुपर Amoled डिस्प्ले
- रिझॉल्यूशन 1080x1920 पिक्सेल
- 64-बिट क्लास क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 615 सीरिज ऑक्टा-कोर 1.5GHz प्रोसेसर 
- 2GB रॅम
- ड्रेनो 405 GPU
- अँड्रॉईड ५.१.१ लॉलीपॉप 
- इंटरनल मेमरी १६ जीबी, ३२ जीबीचे दोन वॅरिएंट
- १२८ जीबी एक्सटेंडेबल मायक्रो एसडीकार्डसह
- १६ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, ५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा- 
- ३०५० mAh बॅटरी

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.