नवी दिल्ली : आत्तापर्यंत बाजारात अस्तित्वात असलेल्या अनेक गाड्यांचं मायलेज जास्तीत जास्त 18-28 किलोमीटर प्रती लीटर आहे. पण, आता एका कॉन्सेप्ट कारचं निर्माणच अशा पद्धतीनं करण्यात आलंय की ही गाडी एका लीटरमध्ये जवळपास 100 किलोमीटरपर्यंत चालू शकेल.
कार निर्माती कंपनी ‘रेनो’नं हा नवीन आविष्कार लोकांसमोर आणलाय. एका लीटरमध्ये जवळपास 100 किलोमीटर चालणारी एक कार नुकतीच या कंपनीनं ग्राहकांसमोर सादर केलीय. मिळालेल्या माहितीनुसार, पॅरेसमध्ये नुकतीच इलोब कॉन्सेप्ट कार सादर करण्यात आलीय.
महत्त्वाचं म्हणजे, ‘फॉक्सवॅगन’नंही इतकंच मायलेज देणारी गाडी याआधीच बाजारासमोर सादर केलीय.
‘रेनो’ची ही कार सध्या कॉन्सेप्ट मॉडल म्हणून सादर करण्यात आलीय. ‘रेनो’ही फ्रान्सची प्रसिद्ध कार निर्माता कंपनी आहे. ही कार ‘इलोब’ नावानं सादर करण्यात आलीय.
‘इलोब’ ही एक हायब्रिड कार आहे ज्याचं प्रोडक्शन मॉडलही लवकरच सादर करण्यात येईल. ही कार एका लीटरमद्ये 100 किलोमीटर मायलेज देण्यात सक्षम असलेचा दावा कंपनीनं केलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.