मुंबई: देशातील नंबर वन शॉपिंग वेबसाइट ‘फ्लिपकार्ट’च्या ‘बिग बिलियन डे’ला दमदार सुरुवात झालीय. फ्लिपकार्ट जवळपास सर्वच वस्तूंवर सूट देत आहे. वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार ‘फ्लिपकार्ट’ला या योजनेद्वारे ग्राहकांचा प्रचंड रिस्पॉन्स मिळतोय.
ही ऑफर ६ ऑक्टोबर म्हणजे फक्त आजपुरतीच आहे. या मेगासेलमुळं फ्लिपकार्टची वेबसाइट हॅक होत असून खूप उशीरानं सुरू होतेय आणि क्रॅशही होतेय.
वेबसाइटवर मोटो-ई मोबाईल फक्त ५,४९९ रुपयांमध्ये आणि मोटो-एक्स १७,९९९ रुपयांमध्ये मिळतोय. वेबसाइटला ‘लिमिटेड स्टॉक्स, लिमिटेड टाइम, सेव्ह मोअर, अपकमिंग डील्स, पार्टनर ऑफर्स आणि स्टील डील्स’ या ६ कॅटेगरी मध्ये वाटण्यात आलंय. अपकमिंग डील्समध्ये फ्लिपकार्ट भविष्यात पुन्हा स्कीम ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आहे.
वेबसाइटवर दिलेल्या जाहिरातीनुसार एका रुपयांत पेन ड्राइव्ह आणि ९९ रुपयांमध्ये मोबाइल फोन मिळतोय. सर्व सामानांवर मिळत असलेल्या भरघोस अंतर्गत १ रुपयात खूप सामान मिळतंय. स्मार्टफोनवर जवळपास ३० टक्के सूट दिलीय. तर फॅशनशी निगडीत सामानांवर ५० टक्के सूट जाहीर केलीय. पण आता भरपूर सामान आऊट ऑफ स्टॉक झालंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.