ट्विटर संदेश पाठविण्याची शब्द मर्यादा वाढवणार

सोशल नेटवर्किंग साईट ट्विटरने संदेश पाठवण्याची १४० शब्दांची मर्यादा लवकरच वाढवण्याची घोषणा केली आहे. जुलै महिन्यापासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यामुळे आता ट्विटरवरुन मोठे  संदेश पाठवता येणार आहेत. परंतु सध्या ट्विटरसाठीची शब्दमर्यादा १४० राहणार आहे.

Updated: Jun 13, 2015, 01:08 PM IST
ट्विटर संदेश पाठविण्याची शब्द मर्यादा वाढवणार title=

न्यूयॉर्क : सोशल नेटवर्किंग साईट ट्विटरने संदेश पाठवण्याची १४० शब्दांची मर्यादा लवकरच वाढवण्याची घोषणा केली आहे. जुलै महिन्यापासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यामुळे आता ट्विटरवरुन मोठे  संदेश पाठवता येणार आहेत. परंतु सध्या ट्विटरसाठीची शब्दमर्यादा १४० राहणार आहे.

ट्विटर उत्पादन व्यवस्थापकांनी याबाबत माहिती दिली आहे. 'डायरेक्ट मेसेज  फिचरमध्ये येत्या जुलैमध्ये बदल करण्यात येणार आहे आणि १४० शब्दांची मर्यादा संपुष्टात येणार आहे. त्यामुळे कितीही शब्दात आपल्याला संदेश पाठवता येणार आहे.. फेसबुक आणि लिंक्डईन या सोशल नेटवर्किंग वेबसाईटवर कोणतीही शब्दमर्यादा नसल्याने ट्विटरने उचललेले हे पाऊल स्पर्धेत भर टाकणारे आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.