४७ रुपयांत ५६ जीबी डेटा, कोणती कंपनी देतेय ही ऑफर ?

 रिलायन्स जिओनंतर आता इतर टेलिकॉम कंपन्या ऑफर देण्यासाठी चढाओढ करत आहेत. खास करून डाटाबाबत एअरटेल, रिलायन्स जिओ, वोडाफोनसह अनेक कंपन्या ग्राहकांना आकर्षीत करत आहेत. रोज एक नवीन ऑफरच्या जमान्यात टेलिकॉम कंपनी टेलिनॉरही उतरली आहे. आता ही कंपनी सर्वात स्वस्त डाटा देण्याचा प्लॅन देत असल्याचा दावा करीत आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Mar 28, 2017, 07:22 PM IST
४७ रुपयांत ५६ जीबी डेटा, कोणती कंपनी देतेय ही ऑफर ?  title=

मुंबई :  रिलायन्स जिओनंतर आता इतर टेलिकॉम कंपन्या ऑफर देण्यासाठी चढाओढ करत आहेत. खास करून डाटाबाबत एअरटेल, रिलायन्स जिओ, वोडाफोनसह अनेक कंपन्या ग्राहकांना आकर्षीत करत आहेत. रोज एक नवीन ऑफरच्या जमान्यात टेलिकॉम कंपनी टेलिनॉरही उतरली आहे. आता ही कंपनी सर्वात स्वस्त डाटा देण्याचा प्लॅन देत असल्याचा दावा करीत आहे. 

४७ रुपयांत ५६ जीबी डाटा 

टेलीकॉम कंपनी टेलीनॉर आपल्या युजर्ससाठी खास प्लॅन तयार केला आहे. हा प्लॅन सर्वात स्वस्त मानला जात आहे. या युजर्सला ४७ रुपयांत ५ जीबी डाटा मिळणार आहे. म्हणजे ८३ पैशात १ जीबी ४ जी डाटा मिळणार आहे. 

काय आहे अटी 

हा प्लॅन घेतल्यानंतर अट म्हणजे हा डाटा २८ दिवसांत तुम्हाला यूज करायचा आहे.  जे ग्राहक रोज २ जीबी डाटा यूज करतात तेच हा प्लॅन निवडू शकणार आहेत. टेलिनॉरच्या मते युजर्सलाा केवळ ८० पैशात एक जीबी डाटा मिळणार आहे.