जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम विभागातील रिक्त पदांसाठी परीक्षा

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम विभागातील खालील पदांसाठी भरतीकरिता आयोगामार्फत महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा - २०१५ दि. २५ ऑक्टोबर रोजी मुंबई, औरंगाबाद, नागपूर व पुणे या चार जिल्हा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

Updated: Aug 12, 2015, 08:49 AM IST

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम विभागातील खालील पदांसाठी भरतीकरिता आयोगामार्फत महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा - २०१५ दि. २५ ऑक्टोबर रोजी मुंबई, औरंगाबाद, नागपूर व पुणे या चार जिल्हा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभागात एकूण २१ पदे, रिक्त व आरक्षणाची १४ पदे, सहायक अभियंता गट-ब श्रेणी-२ एकूणू २१९ पदे आणि रिक्त व आरक्षणाची १४४ पदे, जलसंपदा विभागात एकूणू १२६ आणि रिक्त व आरक्षणाची ८२ तसेच अनुशेषाची पदे भरण्यात येणार आहेत.

अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहा :

imggallery

 

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

 झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.