पावसाळा आला, आता शॉर्ट निवडताना ही काळजी घ्या

पावसाळा सुरू झाला की सर्वांना शॉर्ट घालायला आवडते, कारण पावसाळ्यात तशी ती सोयीस्करही असते, कपडे खराब होत नाहीत. चिखलाचे डाग पडण्याचा अथवा कपडे ओले होणे या बाबी टाळता येतात.

Updated: Jul 5, 2016, 07:52 PM IST
पावसाळा आला, आता शॉर्ट निवडताना ही काळजी घ्या title=

मुंबई : पावसाळा सुरू झाला की सर्वांना शॉर्ट घालायला आवडते, कारण पावसाळ्यात तशी ती सोयीस्करही असते, कपडे खराब होत नाहीत. चिखलाचे डाग पडण्याचा अथवा कपडे ओले होणे या बाबी टाळता येतात.

शॉर्ट सोयीची असली तरी, स्वतःत बदल करणे आवश्यक आहे, तरच तुम्हाला केलेली फॅशन सुट होईल. यामुळे शॉर्ट्स वापरतानाही काही बाबतीत काळजी घेणे अवश्य आहे.

शॉर्ट्स घालण्यापूर्वी त्याचा प्रकार आणि लांबी निश्चित करा आणि त्यानंतरच वापरा. यात दोन प्रकार असतात. एक हॉट पँट आणि दुसरी गुढघ्याच्या लांबीपर्यंत असलेली नी-लेवल पँट. यासाठी गडद रंगाची निवड करावी. या पँटवर वेगवेगळ्या प्रकारचे टॉप्स घालून तुम्ही हवी ती फॅशन करू शकता. 

शॉर्ट्स घालताना आकर्षक रंग निवडावे. उदाः गडद पिवळा, आकाशी निळा, लाल हे रंग खास उठून दिसतात. असे असले तरी तुमच्या त्वचेचा रंग लक्षात घेवूनच पँटचा रंग निवडावा. 

प्रसंगानुसार शॉर्ट्सची लांबी निश्चित करता येईल. जसे की, पार्टीसाठी हॉट पँट घालता येईल आणि  शॉपिंगला जायचे असल्यास केप्री किंवा नी-लेवल पँट वापरू शकता. 

शॉर्ट्स घालण्यापूर्वी पाय नीट स्वच्छ करावे. नियमितपणे वॅक्सिंग व पेडीक्युअर करावे. गुडघे स्वच्छ ठेऊन त्याचा काळेपणा कमी करावा. पायाच्या त्वचेला सनस्क्रीन क्रीम लावूनच बाहेर पडावे. नाहीतर त्वचा काळवंडेल व निस्तेज होईल.