VIDEO : कुठल्याही वाद्याशिवाय संगीताचा 'पिंगा' वायरल

आपल्या बहिणीसोबत कप साँग गात ठेका धरायला लावणारी अंतरा नंदी आठवतेय का हो... होय, याच अंतराचा आता एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

Updated: May 24, 2016, 09:36 PM IST
VIDEO : कुठल्याही वाद्याशिवाय संगीताचा 'पिंगा' वायरल title=

मुंबई : आपल्या बहिणीसोबत कप साँग गात ठेका धरायला लावणारी अंतरा नंदी आठवतेय का हो... होय, याच अंतराचा आता एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

गंमत म्हणजे, या व्हिडिओत गाताना अंतरानं आणि तिच्या बहिणीनं ना कुठल्या वाद्याची मदत घेतलीय... ना कपची...! तरीही या दोघी अफलातून रिदम निर्माण करण्यात यशस्वी झाल्यात. 

२२ मे रोजी पोस्ट केलेल्या या व्हिडिओला दोनच दिवसांत तब्बल ९,८४,१४७ लोकांनी पाहिलंय तर १३,४३९ जणांनी हा व्हिडिओ शेअर केलाय.