सेल्फी चाहत्यांसाठी मायक्रोमॅक्सचा नवा स्मार्टफोन

भारतीय मोबाईल हॅन्डसेट निर्माता कंपनी मायक्रोमॅक्सनं सेल्फीच्या नादखुळ्या लोकांसाठी एक नवा स्मार्टफोन लॉन्च केलाय. 

Updated: May 24, 2016, 04:48 PM IST
सेल्फी चाहत्यांसाठी मायक्रोमॅक्सचा नवा स्मार्टफोन title=

मुंबई : भारतीय मोबाईल हॅन्डसेट निर्माता कंपनी मायक्रोमॅक्सनं सेल्फीच्या नादखुळ्या लोकांसाठी एक नवा स्मार्टफोन लॉन्च केलाय. 

'बोल्ट सेल्फी' असं या स्मार्टफोनचं नाव आहे. 'फ्लिपकार्ट' या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवर व्हाईट आणि शॅम्पेन रंगाच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला हा स्मार्टफोन उपलब्ध असेल. 

या ४जी एलटीई सपोर्ट स्मार्टफोनमध्ये ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आलाय. फोनची स्क्रीन ४.५ इंचाची आहे आणि यामध्ये १ गिगाहर्टझचं मीडियाटेक क्वाडकोर प्रोसेसरसोबत १ जीबी रॅम देण्यात आलाय. याची इंटरनल मेमरी ८ जीबी आहे. याला तुम्ही मायक्रो एसडी कार्डाच्या साहाय्याने ३२ जीबीपर्यंत वाढवू शकता.

अॅन्ड्रॉईड ५.१ लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टम असलेल्या या स्मार्टफोनमध्ये ड्युएल सिम सपोर्ट देण्यात आलाय. यामध्ये १७५० मेगाहर्टझची बॅटरी देण्यात आलीय. १८ तासांचा टॉकटाईम तुम्हाला यामुळे उपलब्ध होऊ शकेल. 

बेसिक फोटोग्राफीसाठी यामध्ये एलईडी फ्लॅशसोबत ५ मेगापिक्सल रिअर कॅमेरा देण्यात आलाय. यामध्ये वायफाय, जीपीएस, मायक्रो यूएसबी आणि ब्लूटूथचाही समावेश आहे.