सॅमसंगचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन Z2चा फोटो लीक

स्मार्टफोनच्या जगात नंबर-1 ब्रांड सॅमसंगचा एंट्री लेव्हल स्मार्टफोन Z2चा फोटो लीक झालाय. हा फोन आगामी काही महिन्यांमध्ये बाजारात येतोय. अँड्राइड शिवाय हा फोन Tizen ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित आहे.

Updated: May 5, 2015, 12:20 PM IST
सॅमसंगचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन Z2चा फोटो लीक title=

नवी दिल्ली: स्मार्टफोनच्या जगात नंबर-1 ब्रांड सॅमसंगचा एंट्री लेव्हल स्मार्टफोन Z2चा फोटो लीक झालाय. हा फोन आगामी काही महिन्यांमध्ये बाजारात येतोय. अँड्राइड शिवाय हा फोन Tizen ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित आहे.

ऑनलाइन लीक झालेल्या फोटोमध्ये सॅमसंग Z2 गॅलेक्सी SIII आणि गॅलेक्सी S4 सारखा दिसतो. कंपनीची योजना आहे की, हा फोन अशाच बाजारात आणायचाय जिथं स्मार्टफोन विक्री जास्त आहे, असं सांगितलं जातंय.

कंपनीच्या या नव्या स्वस्त स्मार्टफोनमध्ये 32-bit-quad-core CPU आहे. यात 2000mAhची बॅटरीही यात असेल. सॅमसंग Z2मध्ये qHD TFT-LCD डिस्प्ले असेल आणि हा स्मार्टफोन पहिलेपासूनच बाजारात असलेल्या Z1ला रिप्लेस करेल. 

आतापर्यंत या फोनच्या किमतीबाबत कोणतीही बातमी आली नाहीय. पण याची किंमत z1च्या किमतीच्या जवळपास असेल असं सांगण्यात येतंय. ऑनलाइन बाजारात सॅमसंग z1ची किंमत अवघी 5,500 रुपयांच्या जवळपास आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.