मुंबई : पेप्सिको इंक (PepsiCo Inc) या कंपनीने ऑक्टोबरमध्ये घोषणा केली होती की चीनमध्ये आपला अँड्रॉइड फोन लॉन्च करणार आहे. सुमारे एका महिन्यानंतर चीनमध्ये पेप्सीने फोन पी१एस (Pepsi Phone P1s) नावाने लॉन्च केला आहे.
पेप्सिको आपल्या शीतपेयाच्या व्यवसायात काम करणार आहे पण या नव्या क्षेत्रातही त्यांनी आपले नशीब आजमाविण्याचा प्रयत्न केला आहे. स्मार्टफोन निर्माण करणाऱ्या शेन्जेन कम्युनिकेशन इक्युमेंट्स लिमिटेडशी करार केला आहे. ही कंपनी पेप्सीसाठी स्मार्टफोन तयार करणार आहे. सध्या हा फोन चिनी बाजारासाठी उपलब्ध होणार आहे. कंपनीने आपल्या स्मार्टफोनच्या रेंजमध्ये पेप्सी पी1 आणि पी1एस लॉन्च केला आहे.
पेप्सीचा हा फोन पी1एस jd.com वर उपलब्ध आहे. या फोनची किंमत ६९९ युआन म्हणजे ७२०० रूपये आहे. याची फोनची ५.५ इंचाची फूल एचडी स्क्रिन आहे. त्यात फिंगरप्रिंट स्कॅनरची सुविधा आहे. यात अँड्रॉइड ५.१ लॉलीपॉप देण्यात आले आहे.
यात 1.7 गीगाहर्ट्स मीडियाटेक एमटी6592 ऑक्टा कोर प्रोसेसर, 2 जीबी रॅम, माली 450-एमपी4 जीपीयू आणि 16 जीबी इंटरनल स्टोरेजची सुविधा आहे। एक्सटर्नल मेमरीच्या माइक्रोएसडी कार्डचा वापर करता येणार आहे.
फोटोग्राफीसाठीएलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सल रियर आणि 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. कनेक्टिविटीसाठी 4जी, 3जी, जीपीआरएस/ एज, वाय-फाय, माइक्रो-यूएसबी आणि ब्लूटूथची सुविधा आहे. फोनची बॅटरी 3000एमएएच आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.