'ट्विटर'ने 'वाईन'ला खिंडीत गाठलं, आता 'व्हिडिओ ट्विट'

 ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग वेबसाईटसमोर वाईन सारख्या शॉर्ट व्हिडीओ अपलोड करणाऱ्या काही वेबसाईटचं आव्हान उभं ठाकलं होतं, ट्विटरने वेळीच यावर ऑप्शन उपलब्ध करून दिल्याने अशा वेबसाईट्स धाबं दणाणलं आहे.

Updated: Jan 29, 2015, 09:30 AM IST
'ट्विटर'ने 'वाईन'ला खिंडीत गाठलं, आता 'व्हिडिओ ट्विट' title=

मुंबई :  ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग वेबसाईटसमोर वाईन सारख्या शॉर्ट व्हिडीओ अपलोड करणाऱ्या काही वेबसाईटचं आव्हान उभं ठाकलं होतं, ट्विटरने वेळीच यावर ऑप्शन उपलब्ध करून दिल्याने अशा वेबसाईट्स धाबं दणाणलं आहे.

ट्विटरवर आता ग्रुप मेसेज आणि ३० सेकंदांचा व्हिडिओ शेअर करणं शक्य होणार आहे. 'वाईन डॉट को' ला याचा मोठा फटका बसणार आहे, ही साईट ३० सेकंदाचा व्हिडीओ अपलोड करण्याच्या बाबतीत प्रचंड लोकप्रिय होत असतांना ट्विटरने हे पाऊल उचललं आहे. 

दुसरीकडे फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटसाठीही हा नवा पर्याय म्हणता येईल, काही दिवसांपूर्वीच ट्विटरने ट्विट ‘रिकॅप’ करणारा फीचर अॅड केले होते.

व्हिडिओ शेअर
 
व्हिडिओ शेअर करत असताना, युजर्सने व्हिडिओ शूट केल्यानंतर एडिट करुन शेअर करण्याची मोबाईल अॅपमध्ये सुविधा उपलब्ध असणार आहे. ज्याप्रकारे आता ट्विटरवर फोटो शेअर करण्यासाठी क्लिक केल्यावर शेअर करु शकतो, तसंच व्हिडिओचं असणार आहे. 

अपलोड केलेला व्हिडिओ  हा इतर ट्विटप्रमाणेच असेल. मात्र, व्हिडिओ अंगठ्याच्या नखा एवढा, म्हणजेच थंबनेल सारखा दिसेल. जेव्हा युजर्स त्या व्हिडिओवर क्लिक करेल तेव्हा तो प्ले होईल. सध्या आयफोन अॅपमध्ये हे नवं फीचर उपलब्ध  होणार असले, तरी लवकरच अँड्रॉईड फोन वापरणाऱ्यांसाठीही उपलब्ध केले जाईल, असे ट्विटरकडून सांगण्यात आले आहे. शिवाय आयफोन वापरणारे मोबाईलमध्ये सेव्ह असलेले ३० सेकंदांचे व्हिडिओही शेअर करु शकणार आहे.
 
डायरेक्ट मेसेजची सुविधा
डायरेक्ट मेसेजेद्वारे आता अनेक फॉलोअर्सना एकाच वेळी मेसेज करता येणं शक्य आहे. शिवाय युजर्सना प्रायव्हेट मेसेजही पाठवता येणार आहे. कुणाला ग्रुप मेसेज पाठवायचा हे युजर्झ निवडू शकतात आणि ज्या फॉलोअरला निवडलं आहे त्याला तशी नोटिफिकेशन जाईल. ग्रुप डायरेक्ट मेसेजमध्ये सध्या फक्त २० फॉलोअर्सना ग्रुपमध्ये अॅड करता येणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.