२५१ रूपयात फोन देणारी कंपनी स्वस्तात एलईडी टीव्ही देणार

२५१ रूपयांत स्वस्तात फोन देण्यात वादात आलेल्या रिंगिंग बेल या कंपनीने आणखी एक घोषणा केली आहे.  रिंगिंग बेल आता सर्वात स्वस्त एलईडी टीव्ही देणार आहे, अशी घोषणा रिंगिंग बेलने केली आहे.

Updated: Jun 26, 2016, 01:39 PM IST
२५१ रूपयात फोन देणारी कंपनी स्वस्तात एलईडी टीव्ही देणार title=

नवी दिल्ली : २५१ रूपयांत स्वस्तात फोन देण्यात वादात आलेल्या रिंगिंग बेल या कंपनीने आणखी एक घोषणा केली आहे.  रिंगिंग बेल आता सर्वात स्वस्त एलईडी टीव्ही देणार आहे, अशी घोषणा रिंगिंग बेलने केली आहे.

आता, रिंगिंग बेल दहा हजाराच्या आत ३२ इंची आकाराचा टीव्ही देणार असल्याचं कंपनीने म्हटलं आहे.

२५१ रूपयात स्मार्टफोन देण्याची घोषणा रिंगिंग बेलने केली होती, तेव्हा नोंदणीला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. काही ग्राहकांनी फसवणुकीचा देखील आरोप केला आहे. मात्र आता कंपनी सर्वांना ३० जूनपर्यंत बुकिंग केलेल्या ग्राहकांना  फ्रिडम २५१ हे मॉडेल पाठवणार असल्याचं कंपनीचे सहसंस्थापक मोहित गोयल यांनी म्हटलं आहे