वय वर्षे २५ पूर्वी लग्न करु नका, जाणून घ्या वैज्ञानिक कारण

लग्न ही गोष्ट जीवनातील महत्त्वाची घटना असते. एकदाचे लग्नाचे वय झाले की वर-वधू संशोधन सुरु होते. पूर्वी भारतात मुला-मुलींचे बालविवाह केले जात असत. मात्र याला कायद्याने बंदी असल्याने हे प्रकार कमी झालेत. केवळ कायद्यातच नव्हे तर भारतीय पौराणिक ग्रंथानुसार कमी वयात लग्न योग्य नसल्याचे म्हटलेय. 

Updated: Jun 26, 2016, 09:59 AM IST
वय वर्षे २५ पूर्वी लग्न करु नका, जाणून घ्या वैज्ञानिक कारण title=

मुंबई : लग्न ही गोष्ट जीवनातील महत्त्वाची घटना असते. एकदाचे लग्नाचे वय झाले की वर-वधू संशोधन सुरु होते. पूर्वी भारतात मुला-मुलींचे बालविवाह केले जात असत. मात्र याला कायद्याने बंदी असल्याने हे प्रकार कमी झालेत. केवळ कायद्यातच नव्हे तर भारतीय पौराणिक ग्रंथानुसार कमी वयात लग्न योग्य नसल्याचे म्हटलेय. 

आयुर्वेद सांगते २५व्या वयात लग्न करणे योग्य

आयुर्वेदानुसार मनुष्याचे आयुष्य साधारण १०० वर्षांचे असते. त्यानुसार जीवनाला चार भागात विभागण्यात आलेय. ब्रह्म्चर्य आश्रम, ग्रहस्‍थ आश्रम, वानप्रस्‍थ आश्रम आणि संन्‍यास आश्रम. यातील प्रत्येकाला २५ वर्षात विभागण्यात आलेय. यानुसार ग्रहस्थाश्रमाला २५व्या वर्षानंतर सुरुवात होते. त्यामुळे २५व्या वर्षात विवाह करणे योग्य होय.

शरीरसंबंधामध्ये येतो अडथळा

विज्ञान आणि शास्त्रानुसार वयाच्या २५व्या वर्षात येताना स्त्री आणि पुरुष हे शरीरसंबंध ठेवण्यासाठी परिपक्व होतात. त्यापूर्वी लग्न झाल्यास स्त्री अथवा पुरुषांना शरीरसंबधांमध्ये अडथळा येण्याची शक्यता असते. 

लवकर येते म्हातारपण

वयाच्या २५व्या वर्षापूर्वी शरीरसंबंध केल्यास लवकर म्हातारपण येते. तसेच कमी वयात शरीरसंबंध ठेवणाऱे लोक मानसिकदृष्ट्या कमकुवत असू शकतात.