आता कॉल ड्रॉप झाल्यानंतर बॅलेन्सच्या रुपात मिळतील पैसे!

मोबाईलवर बोलता-बोलता मध्येच फोन कट झाला तर आता आपल्याला पैसे मिळतील. या योजनेची सुरूवात ऑगस्ट महिन्यात होणार आहे. म्हणजे ऑगस्टपासून आपला फोन ड्रॉप झाल्यास त्याची परतफेड आपल्याला मिळेल. रिपोर्टनुसार बॅलेन्सच्या रुपात मिळणारा हा पैसा मोबाईल कंपन्या देतील.

Updated: Jun 1, 2015, 11:07 AM IST
आता कॉल ड्रॉप झाल्यानंतर बॅलेन्सच्या रुपात मिळतील पैसे! title=

नवी दिल्ली: मोबाईलवर बोलता-बोलता मध्येच फोन कट झाला तर आता आपल्याला पैसे मिळतील. या योजनेची सुरूवात ऑगस्ट महिन्यात होणार आहे. म्हणजे ऑगस्टपासून आपला फोन ड्रॉप झाल्यास त्याची परतफेड आपल्याला मिळेल. रिपोर्टनुसार बॅलेन्सच्या रुपात मिळणारा हा पैसा मोबाईल कंपन्या देतील.

या प्रोजेक्टवर तीन महिन्यांपासून ट्रायल सुरू होती जी आता पूर्ण झालीय. दूरसंचार विभागामध्ये असे उपकरण लावले गेलेत ज्याद्वारे देशातील प्रत्येक मोबाईल सर्कलवर देखरेख ठेवली जाईल. या तंत्रज्ञानामुळं कधी, कुठे, कोणता फोन ड्रॉप झाला हे कळेल.

ट्रायच्या मानदंडानुसार कॉल ड्रॉप रेट दोन टक्क्यांहून अधिक असू नये. मात्र देशातील सरासरी प्रत्येक ४-५ कॉलनंतर एक कॉल ड्रॉप होतेय. कॉल ड्रॉप रेट सतत वाढतोय, जो तीन टक्क्यांपासून १४ टक्क्यांपर्यंत पोहोचलाय. थ्री जी सेवांमध्ये कॉल ड्रॉपची समस्या अधिक वाढलेली आहे.

एका रिपोर्टनुसार सरासरी एक मोबाईल ग्राहक प्रत्येक महिन्यात जवळपास ४०० मिनीटांचा कॉल करतो. याप्रमाणे एका वर्षात जवळपास ४५०० मिनीटांचा कॉल होतो. रिपोर्टनुसार प्रत्येक चौथा किंवा पाचवा कॉल काही सेकंदांच्या बोलण्यानंतरमध्येच ड्रॉप होतो. मात्र टेलिकॉम कंपन्या पूर्ण मिनीटाचे पैसे वसूल करतात. याद्वारे त्यांना दरवर्षी कोट्यवधींचा फायदा होतो.

चर्चा एका सेकंदाची असो किंवा एका मिनीटाची कंपन्या पूर्ण मिनीटांचे पैसे घेतात. मात्र कॉल ड्रॉप एका सेकंदापासून ५ सेकंदापर्यंत अधिक होतात. यामुळं ग्राहकाचं खूप नुकसान होतं आणि कंपन्यांचा फायदा. जर आपला टॅरिफ प्लान प्रति सेकंदवाला असेल तर आपल्याला जास्त नुकसान होणार नाही. मात्र प्लान प्रति मिनीट वाला असेल तर आपलं खूप नुकसान होतं. 

दूरसंचारच्या अधिकाऱ्यांनी या योजनेबद्दल माहिती देत सांगितलं की, मोबाईल कंपनीला कॉल ड्रॉपच्या तीन तासांनंतर ग्राहकाच्या ट्रायमधील रजिस्टर खात्यात पैसे टाकावे लागतील. सरकारनं यावर नजर ठेवायला व्यवस्था बनवलीय. दूरसंचार मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी या योजनेबद्दल माहिती देत सांगितलं की, कॉल ड्रॉपमुळे दरवर्षी ग्राहकांचं कोट्यवधींचं नुकसान होतं. नव्या व्यवस्थेमुळं ग्राहकांना फायदा मिळेल. खासकरून गाव आणि दूरवर राहणाऱ्या भागांमधील ग्राहकांना फायदा होईल, कारण तिथं जास्त कॉल ड्रॉप होतो. 

जर आपला कॉल ड्रॉप होत आहे तर जितक्या सेकंद किंवा मिनीटाचे पैसे कट होतील तितकेच पैसे आपल्या खात्यामध्ये जमा होतील. ही अमाऊंट आपल्या बॅलेंसमध्ये आठवड्यातून एकदा होईल. आपल्या बॅलेंसमध्ये जमा होणारा हा पैसा कॉल ड्रॉपनंतर कंपन्यांवर लावलेल्या दंडाद्वारे मिळेल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.