नवी दिल्ली : जिओला टक्कर देण्यासाठी सरकारी टेलीकॉम कंपनी बीएसएनएलने आपल्या ३ जी इंटरनेटची खास ऑफर जाहीर केली आहे. आपल्या दरात सुमारे ३/४ ने कपात केली आहे. त्यानुसार आता १ जीबी डाटा फक्त ३६ रुपये ते २ जीबी डाटा हा ७८ रुपयात मिळणार आहे.
भारत संचार निगम लिमीटेड यांनी आपल्या स्पेशल टेरिफ व्हॉवचर्सचा डाटामध्ये चार पट वाढ केली आहे. असे बीएससएनएलने पत्रकात म्हटले आहे.
२९१ रुपयात आता ८ जी डाटा २८ दिवसांच्या व्हॅलिडीटीसाठी मिळणार आहे. पूर्वी याच किंमतीत फक्त २ जीबी डाटा देण्यात येत होता. तर ७८ रुपयात २ जीबी डाटा देण्यात येणार आहे.
टेलीकॉम इंडस्ट्रीत सर्वात कमी दरात म्हणजे ३६ रुपयात १ जीबी डाटा देण्याची बीएसएनएलकडून ऑफर देण्यात आली आहे.
रिलायन्सने आपल्या ग्राहकांना ३१ मार्चपर्यंत फ्री डाटा देण्याची ऑफर दिली आहे. पण दिवसात १ जीबी डाटा वापरण्याची मुभा दिली आहे. आता अनेक युजर्स असल्याने अनेकांचा स्पीड कमी झाला आहे.