नोकिया 4जी, 3जी मोबाइल फोनची कीमत कमी करणार

 नोकियाने भारतात ४ जी आणि ३ जी मोबाईल फोनच्या किंमती कमी करण्याचे संकेत दिले आहे. आगामी 4 जी सेवांचा फायदा उचलण्यासाठी आणि बाजारातील हिस्सेदारी वाढविण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. 

Updated: Sep 8, 2014, 03:24 PM IST
नोकिया 4जी, 3जी मोबाइल फोनची कीमत कमी करणार title=

बर्लिन:  नोकियाने भारतात ४ जी आणि ३ जी मोबाईल फोनच्या किंमती कमी करण्याचे संकेत दिले आहे. आगामी 4 जी सेवांचा फायदा उचलण्यासाठी आणि बाजारातील हिस्सेदारी वाढविण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. 

मायक्रोसॉफ्टच्या मोबाईल डिव्हाइस सेलचे व्हाइस प्रेझिडंट (कॉर्पोरेट) कृष वेबरने सांगितले की, ज्या ठिकाणी आम्ही आहे, त्या ठिकाणाहून किंमत करू पाहत आहे. 

या किंमती ३ जी आणि एलटीई (४जी) या दोघांच्या किंमती कमी होतील, यामुळे बाजारातील हिस्सेदारीला फायदा होईल.  

मायक्रोसॉफ्टने नोकिया मोबाईल फोन विकत घेतला आहे. यावेळी भारतातील मोबाईल बाजारात नोकिया तिसऱ्या स्थानावर आहे. नोकियाने एन्ड्रॉइडवर चालणारा फोन बाजारात आणल्याने त्याच्या लोकप्रियतेत वाढ झाल आहे. त्यामुळे कोरियाची कंपनी सॅमसंगला आणि भारतीय कंपन्यांना मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. 

नोकियाचा सर्वात स्वस्त ४ जी फोन लुमिया ६३५ ची किंमत सुमारे ११३०० (टॅक्स व्यतिरिक्त) परंतु हा भारतात उपलब्ध नाही.  

वेबर यांनी सांगितले की, आम्ही ६३५ सारख्या एलटीई हँडसेटच्या किंमती कमी करण्याचा प्रयत्न आहे. याने भारतीय दूरसंचार कंपन्यांच्या ४ जी सेवा सुरू करण्याच्या योजनांचा लाभ उठविता येईल. 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीची ऑक्टोबरमध्ये ४ जी असलेल्या लुमिया ८३०  बाजारात आणण्याची योजना आहे. याची किंमत २६,००० रुपये आहे. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.