राहुल गांधींच्या भाषणानंतर "नेट न्युट्रॅलिटी' ट्रेंड

 तरूणांसाठी महत्वाचा विषय असलेल्या नेट न्यूट्रॅलिटीवर राहुल गांधी यांनी संसदेत आवाज उठवला आहे. लोकसभेत "'नेट न्युट्रॅलिटी' या विषयावर चर्चेचा मुद्दा उपस्थित केला, यानंतर "#RGforNetNeutrality‘ या हॅशटॅगद्वारे ट्विटरवर ट्रेंड आला आहे.

Updated: Apr 22, 2015, 04:42 PM IST
राहुल गांधींच्या भाषणानंतर "नेट न्युट्रॅलिटी' ट्रेंड title=

नवी दिल्ली :  तरूणांसाठी महत्वाचा विषय असलेल्या नेट न्यूट्रॅलिटीवर राहुल गांधी यांनी संसदेत आवाज उठवला आहे. लोकसभेत "'नेट न्युट्रॅलिटी' या विषयावर चर्चेचा मुद्दा उपस्थित केला, यानंतर "#RGforNetNeutrality‘ या हॅशटॅगद्वारे ट्विटरवर ट्रेंड आला आहे.

कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज सकाळी नेट न्युट्रॅलिटीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर ट्‌विटरवर त्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येऊ लागल्या. त्यानंतर काही वेळातच #RGforNetNeutrality हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये आला. 

 'इंटरनेट न्युट्रॅलिटी हा खूप अवघड शब्द असून, नेटचा अधिकार अशी त्याची सोपी व्याख्या करता येईल. प्रत्येक युवकाला नेट वापरण्याचा अधिकार आहे. माझी सरकारला विनंती आहे, नेट न्युट्रॅलिटीचा अधिकार सर्वांना दिला पाहिजे. नेट न्युट्रॅलिटीवर कायदा करण्यचीा गरज आहे' अशा शब्दांत राहुल गांधी यांनी आज लोकसभेत या विषय मांडला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.