ह्युस्टन (अमेरिका) : अमेरिकतील एका मूळ भारतीय तरुणासमवेत चार विद्यार्थ्यांनी एक अशी नेलपॉलिश बनवलीय जी बलात्कार रोखू शकेल... वाटलं ना आश्चर्य?
पण, या विद्यार्थ्यांनी केलेल्या दाव्यानुसार, या नेलपॉलिशच्या साहाय्यानं कोणत्याही पेय पदार्थात मादक पदार्थांचा अंश असल्यास लगेचच कळू शकेल. लैंगिक शोषणाच्या काही प्रकरणात काही मादक पदार्थांचा वापर केल्याचं अनेकदा समोर आलंय.
नॉर्थ कॅरोलिना स्टेट यूनिव्हर्सिटीच्या चार विद्यार्थ्यांनी या नेलपॉलिशच्या साहाय्यानं एखाद्या पेय पदार्थात डेट रेप ड्रग्स असेल तर लगेचच समजू शकेल. अमेरिकन – भारती विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या या टीमनं ‘अंडरकव्हर कलर्स’ नावाच्या या नेलपॉलिशचा अविष्कार केलाय.
नेल पॉलिश पडताळून पाहण्यासाठी महिलेला केवळ आपल्या बोटानं पेय पदार्थाला हलवायचंय. पेय पदार्थात रोहिप्नोल, जानक्स किंवा जीएचबी (गामा-हायड्रोक्सीबुटिरिक अॅसिड) सारखे डेट रेप ड्रग्स असल्यास लगेचच नेल पॉलिशचा रंग बदलून जाईल.
अंडरकव्हर कलर्सच्या चारही संस्थापकांच्या म्हणण्यानुसार, ते कोणत्या ना कोणत्या अशा व्यक्तीला ओळखतात जे लैंगिक शोषणाचे शिकार झालेत. अशा घटना टाळण्यासाठी या नेलपॉलिश बनविण्याची कल्पना आपल्याला आल्याचं त्यांनी म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.