नवी दिल्ली: काही दिवसांपूर्वी एक गाणं म्हणून 47 लाखांहून अधिक इंटरनेटवर ज्यानं सनसनी पसरवली होती तो वेणू मल्लेशनं आइस बकेट चॅलेंज आपल्या वेगळ्याच अंदाजात केलंय. वेणू मल्लेशनं एएलएसच्या जागरुकतेसाठी एक गाणं गायलंय आणि यू-ट्युबवर अपलोड केलंय.
मल्लेशनं सांगितलं की, त्याचं नाव कोणीही नॉमिनेट केलं नाहीय. त्यानं स्वत:च आपलं नाव नॉमिनेट करत हे चॅलेंज पूर्ण केलं.
या व्हिडिओमध्ये वेणू मल्लेश गातोय, नाचतोय आणि आइस बकेट चॅलेंजही पूर्ण करतोय. एएलएससाठी हे गाणं स्वत: मल्लेशनं लिहिलंय आणि गायलंय. डांसही वेणू मल्लेश आपल्याच स्टाइलनं करतोय. या व्हिडिओला आतापर्यंत 44 हजार लोकांनी पाहिलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.