एस्सेलवर्ल्डमध्ये रंगला 'रॉक बँड'चा थरार

शनिवारी एस्सेलवर्ल्ड आणि वॉटरकिंग्डममध्ये एस्सेलवर्ल्ड रॉक हा कार्यक्रम रंगला. या रॉक बँडचा थरार अनेकांना अनुभवायला मिळाला. रॉक बँडच्या चाहत्यांसाठी तर ही पर्वणीच ठरली. एस्सेलवर्ल्डने आयोजन केलेल्या या रॉक बँड स्पर्धेमध्ये देशभरातून 50 हून अधिक रॉक बँड टीम्सने प्रवेश नोंदवला होता. त्यामधून ३ रॉक बँड टीम्सला मुख्य इवेंटसाठी निवडण्यात आलं होतं. 

Updated: Sep 25, 2016, 06:22 PM IST
एस्सेलवर्ल्डमध्ये रंगला 'रॉक बँड'चा थरार title=

मुंबई : शनिवारी एस्सेलवर्ल्ड आणि वॉटरकिंग्डममध्ये एस्सेलवर्ल्ड रॉक हा कार्यक्रम रंगला. या रॉक बँडचा थरार अनेकांना अनुभवायला मिळाला. रॉक बँडच्या चाहत्यांसाठी तर ही पर्वणीच ठरली. एस्सेलवर्ल्डने आयोजन केलेल्या या रॉक बँड स्पर्धेमध्ये देशभरातून 50 हून अधिक रॉक बँड टीम्सने प्रवेश नोंदवला होता. त्यामधून ३ रॉक बँड टीम्सला मुख्य इवेंटसाठी निवडण्यात आलं होतं. 

Across Seconds, Eternal Returns, Tripp Pilots या ३ टीम्समधध्ये मुख्य लढाई होती. अतिशय चुरशीच्या या रॉक बँड इंवेटमध्ये अॅक्रॉस सेकंड्स यांनी बाजी मारली. या स्पर्धेतील विजयी टीमला जेथे प्रत्येक रॉक बँड टीमचं परफॉर्म करण्याचं स्वप्न असतं अशा इंडिपेंडन्स रॉक 2016 (INDEPENDENCE ROCK 2016) या देशातील मोठ्या मंचावर वाईल्ड कार्ड एन्ट्री मिळणार असून परफॉर्मेन्स करण्याची मोठी संधी मिळणार आहे. अॅक्रॉस सेकंड्स बँडला एस्सेलवर्ल्डच्या बीग नाईट २०१६ मध्येही परफॉर्मेन्स करायला मिळणार आहे.

पाहा व्हिडिओ बातमीच्या शेवटी

एस्सेलवर्ल्ड आणि वॉटर किंग्डमचे सीईओ शिरीष देशपांडे यांनी म्हटलं की, 'आम्हाला खूप आनंद आहे की आम्ही इंडिपेंडन्स रॉक यांच्यासोबत जोडलेलो आहोत. एस्सेलवर्ल्ड रॉकच्या माध्यमातून आम्ही फ्रेश आणि खरं टॅलेंट सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न करत आहोत. रॉक बँडच्या निवड समितीच्या माध्यमातून आम्ही बेस्ट टँलेंट निवडण्याचा प्रयत्न करणार आहोत जे भारतीय संगीताला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल.'

इंडिपेंडन्स रॉक हे भारतातील सर्वात जुनं आणि मोठं म्यूजिक फेस्टीवल आहे. या फेस्टीवलमधून अनेक रॉक बँड प्रसिद्धीस आले आहेत. परिक्रमा, झिरो, पेंटाग्राम यासारखे सुप्रसिद्ध रॉक बँड याच फेस्टीवलमधून पुढे आले आहेत. यावर्षीच्या फायनलमध्ये सुप्रसिद्ध संगीतकार फरहाद वाडिया आणि श्रीधर हे जज असणार आहेत.