www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूर
लाल फितीच्या कारभारात अडकलेल्या MPSCनं आणखी एक घोळ घातलाय. जलसंपदा आणि पाणीपुरवठा विभागासाठी सहाय्यक अभियंता जागेसाठी काढलेल्या जाहिरातीत परीक्षा देण्यासाठी पदवी असणं बंधनकारक करण्यात आलंय.
अर्ज भरण्याची अंतिम मुदत १२ ऑगस्ट आहे. मात्र मुंबई, औरंगाबाद, पुणे आणि नागपूर या विद्यापीठांच्या इंजिनियरिंगचे निकाल अद्याप लागलेले नाहीत. तसंच ते १२ ऑगस्टपर्यंत लागण्याची शक्यता नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना अर्जच भरता येणार नाहीयेत. याचा हजारो विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे. त्यांना या परीक्षेला मुकावं लागू शकतं.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं २१ जुलै रोजी ९९७ जागांसाठी ही जाहीरात काढलीये. गेल्या वर्षी याच पदांसाठी डिसेंबरमध्ये परीक्षा झाली. यंदा मात्र अचानक ही परीक्षा अलिकडे आणण्यात आलीये. त्यामुळे यंदा अंतिम वर्षाची परीक्षा दिलेल्या परंतु निकाल न लागलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावं लागण्याची शक्यता आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.