नवा स्मार्टफोन मोटो X सेकंड जनरेशन

मोटोरोलाचा मोटो X सेकंड जनरेशन हा स्मार्टफोन भारतात विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. याची किंमत ३१, ९९९ रुपये आहे.

Updated: Sep 25, 2014, 09:12 AM IST
नवा स्मार्टफोन मोटो X सेकंड जनरेशन  title=

बंगळुरु : मोटोरोलाचा मोटो X सेकंड जनरेशन हा स्मार्टफोन भारतात विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. याची किंमत ३१, ९९९ रुपये आहे.

हा स्मार्टफोन ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध आहे. फ्लिपकार्टच्या माध्यमातून विक्री होणार आहे. 2nd जनरेशन मोटो एक्सची किंमत ३१,९९९ असून आधीच्या मोटो एक्सपेक्षा १०,००० रुपयांनी अधिक आहे.

नविन मोटो एक्सचा डिस्प्ले ५.२ इंच आणि फुल एचडी आहे. स्किन रिझॉल्यूशन ७२०पीने अपग्रेड आहे. मोटो एक्सला वूड बॅक पॅनल दिला गेला आहे.  मात्र, 2nd जनरेशन मोटो एक्सची बॉडी लेदर आणि वूड मिक्स असणार आहे.

यातील प्रोसेरस प्रकिया फास्ट आहे. २ जीबी मेमरी रॅम आहे. १६ आणि ३२ जीबी अशा दोन मेमरीमध्ये हा स्मार्टफोन असणार आहे. तर १३ मेगापिक्सेल कॅमेरा असणार आहे. तर फ्रंट कॅमेरा २ मेगापिक्सेल आहे. फोटो आणि पिक्चर क्वॉलीट चांगली असणार आहे. या फोनला एचडी ४के व्हिडिओ रेकॉडींक सपोर्टही असणार आहे.

अॅड्रॉइड ४.४ किट-कॅट या ऑपरेटिंग सिस्टमवर हा पोन चालेल. यातूल ऑपरेटिंग सिस्टीम अपग्रेडेबल होईल. आपले बजेट ३० हजारांच्या आसपास असेल तर हा फोन घेण्यास हरकत नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.