सेल्फी पोस्ट करायची सवय नातेवाईकांपासून करू शकते दूर!

जर आपल्याला पण सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सेल्फी पोस्ट करण्याची सवय आहे तर सावधान व्हा. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सेल्फी पोस्ट करण्याची आपली ही सवय आपले मित्र, नातेवाईक आणि आपल्यात मोठी भिंत निर्माण करू शकतात.

Updated: Sep 24, 2014, 05:19 PM IST
सेल्फी पोस्ट करायची सवय नातेवाईकांपासून करू शकते दूर!  title=

नवी दिल्ली: जर आपल्याला पण सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सेल्फी पोस्ट करण्याची सवय आहे तर सावधान व्हा. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सेल्फी पोस्ट करण्याची आपली ही सवय आपले मित्र, नातेवाईक आणि आपल्यात मोठी भिंत निर्माण करू शकतात.

एका संशोधकांच्या रिसर्चमध्ये हे सत्य पुढं आलंय. संशोधकांचं म्हणणं आहे की, जे लोकं फेसबुक आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सतत सेल्फी पोस्ट करत असतात, ते हळुहळू आपल्या सोशल लाइफमधून दूर जातात. 

इंग्लंडचे प्रसिद्ध संशोधक डेव्हिड हाउटन यांचं म्हणणं आहे की, सतत सेल्फी पोस्ट करणाऱ्या व्यक्ती त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना आवडत नाहीत. डेव्हिडचं म्हणणं आहे की, जेव्हा फोटो सोशल साइट्सवर पडतो तेव्हा तो अनेक लोकं पाहतात. यानंतर सर्व त्या फोटोवर वेगवेगळे कमेंट्स देतात. जे त्यांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण करतो. 

एका अभ्यासात हे पुढं आलंय की, लोकं पोस्ट करण्यात आपल्या कुटुंबा पेक्षा जास्त मित्रांना महत्त्व देतात. त्यांना सोशल लाइफमध्ये इतका सपोर्ट मिळत नाही. यासोबत मोठ्या ब्रँडसोबत फोटो काढून जे फेसबुकवर पोस्ट करतात त्यांच्याविषयी त्यांचे मित्र निगेटिव्ह विचार येतात. 
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.