गर्लफ्रेन्ड, बॉयफ्रेन्ड, ब्रेक अप, पॅच अपसाठी अॅप

नेटीझन्ससाठी अॅपचं जगचं वेगळं आहे, ताण-तणाव, आप-आपसातील हेवेदावे याच्यामुळे दूर जाण्याचं प्रमाण वाढलं आहे. पाहा असे काही स्मार्ट अॅप्स जे तुम्हाला चांगली गर्लफ्रेन्ड मिळवून देऊ शकतात, थोडक्यात दोन चांगल्या व्यक्तींना जवळ आणू शकतात.

Updated: Dec 3, 2015, 07:45 PM IST
गर्लफ्रेन्ड, बॉयफ्रेन्ड, ब्रेक अप, पॅच अपसाठी अॅप title=

मुंबई : नेटीझन्ससाठी अॅपचं जगचं वेगळं आहे, ताण-तणाव, आप-आपसातील हेवेदावे याच्यामुळे दूर जाण्याचं प्रमाण वाढलं आहे. पाहा असे काही स्मार्ट अॅप्स जे तुम्हाला चांगली गर्लफ्रेन्ड मिळवून देऊ शकतात, थोडक्यात दोन चांगल्या व्यक्तींना जवळ आणू शकतात.

कपल ट्रॅकर
कपल ट्रॅकर हा अॅप दोन्ही जणांनी डाऊनलोड केला तर काहीही हरकत नाहीय, हा ट्रॅक एकमेकांमधील दुवा मानला जात असला तरी तुमचा मित्र किंवा मैत्रिण कुणाशी बोलतेय, त्याचे मेसेज, मेल, चॅटिंग हे दोन्ही जणांमध्ये शेअर होणार आहे. कॉल हिस्ट्री, जीपीएस लोकेशन, फेसबुक कमेन्ट, लाईक्स त्याचं वेळेस दिसण्याची यात सोय आहे.

लव्ह बाईट
हा अॅप तुमच्या नवीन स्क्रॅच कार्डस, नवीन डेटिंग आयडीया, तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठीचा प्लॅटफॉर्म आहे. तुम्ही तुमच्या पार्टनरचं लोकेशन पाहू शकतात, तसेच गुप्त मेसेज देखील पाठवू शकतात. प्रोफाईल पेजवर तुमच्या फोटोज आणि किती दिवसापासून तुम्ही बरोबर आहात ते सेट करता येणार आहे.

अॅव्होकॅडो
या अॅपमध्ये कॅलेन्डर मेटेंन केलेलं आहे, तसेच डेटही लक्षात ठेवण्यात येतात, डान्स लिस्ट, गिफ्ट्स थॉट, डूडल थिम, पार्टनरसोबत सतत कनेक्टेड राहण्यासाठी शेअर लोकेशन, काल्पनिक भेट, किसेस करता येतात.

या शिवाय अॅपच्या दुनियेत असे बरेच अॅप आहेत, ज्यात तुम्हाला योग्य व्यक्तीची सोबत निवडता येणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.