... तर बंद होईल इंटरनेट एक्सप्लोरर!

 तुम्ही ऑपरेटिंग सिस्टिम विंडोज १० चे युजर असाल तर तुमच्यासाठी खुशखबर कारण मायक्रोसॉफ्ट लवकरच इंटरनेट एक्सप्लोरर ऐवजी नवा ब्राउजर आणण्याच्या तयारीत आहे. 

Updated: Dec 31, 2014, 07:52 PM IST
... तर बंद होईल इंटरनेट एक्सप्लोरर! title=

मुंबई :  तुम्ही ऑपरेटिंग सिस्टिम विंडोज १० चे युजर असाल तर तुमच्यासाठी खुशखबर कारण मायक्रोसॉफ्ट लवकरच इंटरनेट एक्सप्लोरर ऐवजी नवा ब्राउजर आणण्याच्या तयारीत आहे. 

या संदर्भात आलेल्या एका बातमीनुसार येणाऱ्या कालावधीत विंडोज १० साठी नवा ब्राउझर येणार आहे. या नव्या ब्राउझरचे नाव 'स्पार्टन' असणार आहे. हे या नव्या विंडोज ब्राऊझरचा कोडनेम स्पार्टन आहे. 

जानेवारीमध्ये होणाऱ्या मायक्रोसॉफ्टच्या एका इव्हेंटमध्ये या ब्राऊझरचे खरे नाव समोर येण्याची शक्यता आहे. असा अनुमान लावण्यात येतोय की हे ब्राउझर संपूर्णपणे नवे असणार आहे. हे इंटरनेट एक्सप्लोरर प्रमाणे बिल्कुल नसणार आहे. 

ही धक्कादायक बाब म्हणजे मायक्रोसॉफ्ट इतक्या वर्षांपासून इंटरनेट एक्सप्लोररशी जोडला आहे. पण ते ब्राउझर आता बंद होणार आहे. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार मायक्रोसॉफ्टचे नवे ब्राऊझर क्रोम किंवा फायरफॉक्स सारखेच दिसते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.