नवी दिल्ली : मायक्रोमॅक्स यु युटोपिया फोन गेल्या आठवड्यात दिल्लीत लाँच झाला होता. आजपासून या स्मार्टफोनची शिपिंग सुरु होत आहे. बऱ्याच प्रतीक्षेनंतर या महिन्यात अखेर मायक्रोमॅक्सने हा स्मार्टफोन लाँच केलाय. या स्मार्टफोनची किंमतही २४ हजार ९९९ रुपये इतकी आहे.
या हँडसेटमध्ये ऑनबोर्ड फिंगरप्रिंट सेंसॉर आहे. युने आपला पहिला स्मार्टफोन डिसेंबर २०१४मध्ये लाँच केला होता. या स्मार्टफोनचा डिस्प्ले ५.२ इंचाचा आहे. २ गिगाहर्टझ ओक्टाकोर स्नॅपड्रॅगन ८१० प्रोसेसरसह ४ जीबी रॅम आहे.
या स्मार्टफोनमध्ये ३२ जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली असून १२८ जीबीपर्यंत तुम्ही वाढवू शकता. यात २१ मेगापिक्सेल रेयर कॅमेरा तर ८ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आलाय. यात ५.१ अँड्रॉईड लॉलीपॉप आहे.