मुंबई : आपण जेथे नोकरी करतो त्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला सावधान असण्याची खूप आवश्यकता असते. जर तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी कोणत्याही वादात्मक गोष्टीवर बोललात तर त्यामुळे तुमची प्रतिष्ठेला धक्का बसू शकतो.
कामाच्या ठिकाणी 3 गोष्टींवर बोलू नका :
धर्म : कामाच्या ठिकाणी धार्मिक गोष्टींवर विश्वास वर बोलण्याचं टाळा. कोणत्याही धर्माबद्दल वाईट किंवा विवादात्मक भाष्य करू नका. तुमच्या धर्मावर गर्व असू द्या पण इतर कोणत्याही धर्माबद्दल वाईट बोलू नका.
राजकारण : राजकारणाचा जेव्ही विषय निघतो तेव्हा प्रत्येक माणून उत्साहीपणे त्यावर बोलायला लागतो. अनेक वेळा कामाच्या ठिकाणी राजकारणाचे विषय निघतात. त्यावर वाद-विवाद करणं टाळा. तुमच्या आवडीच्या नेत्याबद्दल चांगलं आणि इतर दुसऱ्या नेत्याबद्दल काहीही वाईट बोलू नका. याचा तुमच्या प्रतिष्ठेवर परिणाम होतो.
सेक्स लाईफ : कामाच्या ठिकाणी तुमच्या सेक्स लाईफ बद्दल कधीच काही बोलू नका. स्त्रीयांना यामुळे सेक्शूयल हरॉसमेंटचाही सामना करावा लागू शकतो. तुमच्या खाजगी जीवनावर आणि सेक्स लाईफ बद्दल बोलणं टाळा.