सावधान! तुमच्या स्मार्टफोनमध्ये व्हायरस येऊ शकतो

स्मार्टफोनच्या दुनियेत एक पहिल्यांदाच एक व्हायरस दाखल झाला आहे. जर तुमचा फोन ऍड्रॉइडवर असेल तर सावधान! कारण ट्रोजन नावाचा व्हायरस यावर शिरकाव करतोय. 

Updated: Dec 9, 2014, 06:29 PM IST
सावधान! तुमच्या स्मार्टफोनमध्ये व्हायरस येऊ शकतो title=

नवी दिल्ली : स्मार्टफोनच्या दुनियेत एक पहिल्यांदाच एक व्हायरस दाखल झाला आहे. जर तुमचा फोन ऍड्रॉइडवर असेल तर सावधान! कारण ट्रोजन नावाचा व्हायरस यावर शिरकाव करतोय. 

तो तुमच्या स्मार्टफोनवर हल्ला करून महत्वाची माहिती चोरतो, तसेच आपल्या फोनमधील कोणत्याही क्रमांकांना एसएमएसही पाठवतो. या व्हायरसला "AndroidSmssend‘ यासह स्मार्टफोन धारकांना फसविणारी अन्य चार नावे देण्यात आली आहेत. 

हा व्हायरस ऍड्रॉइड आधारित स्मार्टफोन धारकांच्या खाजगी माहितीवर हल्ला करू शकतो. तसेच स्मार्टफोनमधील कोणत्याही संपर्क क्रमांकावर एसएमएसही पाठवू शकतो. याशिवाय काही सशुल्क ठिकाणीही एसएमएस पाठवू शकतो. 

भारतातील इंटरनेट डोमेनवरील हल्ला, हॅकिंग, फिशिंग आणि सुरक्षेबाबत प्रभावी उपाययोजनेसाठी काम करणाऱ्या भारतातील कॉम्प्युटर इमरजन्सी रिस्पॉन्स टीमने (सीईआरटी-इन) याबाबत स्मार्ट फोनधारकांना सावध राहण्याची सूचना दिली आहे. 

सीईआरटी-इनच्या दिलेल्या माहितीनुसार....
या व्हायरसने एकदा डिव्हाइसवर नियंत्रण मिळविले की तो स्पायवेअर इन्स्टॉल करू शकतो. तसेच स्मार्टफोनची सिक्‍युरिटी फायरवॉल बंदही पाडू शकतो. हा व्हायरस स्मार्ट फोनमधील आयएमइआय क्रमांक, डिव्हाइस आयडी, डिव्हाइस टाईप आदी माहिती चोरू शकतो. स्मार्टफोनमधील फोटोज्‌, पासवर्डस्‌, वैयक्तिक बॅंकिंगची माहिती तसेच इतर माहितीही चोरू शकतो. स्मार्टफोनमधील कोणत्याही संपर्क क्रमांकावर एसएमएस पाठवू शकतो. तसेच काही सशुल्क स्थळांवरही एसएमएस पाठवू शकतो. 

सीईआरटी-इनने सुचविलेले काही उपाय... 
कोणतेही ऍप्लिकेशन इन्स्टॉल करण्यापूर्वी मागण्यात आलेल्या परवानग्यांची खात्री करा. 
स्मार्टफोन वेळोवेळी डिव्हाइस मोबाईल सिक्‍युरिटी किंवा मोबाईल अँटि-व्हायरस वापरून स्कॅन करा. 
स्मार्टफोनमध्ये अविश्‍वासार्ह किंवा खात्री नसलेल्या स्थळांवरून काहीही इन्स्टॉल करू नका. 
अनोळखी वाय-फाय स्थळांवरुन स्मार्टफोन कनेक्‍ट करू नका. 
वेळोवेळी स्मार्टफोनवरील माहितीचा बॅकअप घ्या.
फक्त नामांकित स्थळांवरूनच आवश्‍यक त्या ऍप्लिकेशन डाउनलोड करा. 
कोणत्याही लिंकवर क्‍लिक करताना लिंकची खात्री करा. 
वेळोवेळी ऍड्रॉइड अपडेटस्‌ आणि पॅचेस इन्स्टॉल करा. 
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.