या 5 अॅप्सनी करा स्मार्टफोन सुरक्षित

आपला स्मार्टफोन सुरक्षित ठेवण्यासाठी बहुतेक जणं स्क्रीन लॉकचा वापर करतात.

Updated: Jun 18, 2016, 11:08 PM IST
या 5 अॅप्सनी करा स्मार्टफोन सुरक्षित title=

मुंबई : आपला स्मार्टफोन सुरक्षित ठेवण्यासाठी बहुतेक जणं स्क्रीन लॉकचा वापर करतात. पण गुगल प्लेवर उपलब्ध असलेली अॅप्स डाऊनलोडकरून तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमधली अॅप्स, फोटो गॅलरी, व्हिडिओ गॅलरी, कॉन्टॅक्ट, मेल पासवर्ड लावून लॉक करू शकता. यामुळे तुमचा फोन आणखी सुरक्षित होतो. सगळ्यात जास्त वापरण्यात येणाऱ्या पाच स्मार्टफोन लॉक अॅप्सवर एक नजर टाकूयात. 

अॅप लॉक

या अॅपच्या मदतीनं तुम्ही तुमच्या स्मार्टफोनच्या होम स्क्रीनबरोबरच फेसबूक, व्हॉट्स अॅप, स्काईप, गॅलरी, कॉन्टॅक्ट, कॉल लॉगही लॉक करू शकता. यामुळे कोणीही दुसरा व्यक्ती तुमचा स्मार्टफोनमधली माहिती बघू शकणार नाही. गुगल प्ले स्टोअरवर हे अॅप फ्रीमध्ये उपलब्ध आहे. 

क्लिन मास्टर, बूस्ट अँड अॅपलॉक

क्लिन मास्टर अॅपचा उपयोग फक्त स्मार्टफोनचा स्पीड वाढवण्यासाठीच नाही तर फोन लॉक करण्यासाठीही वापर करता येतो. क्लिन मास्टर, बूस्ट अँड अॅपलॉकच्या माध्यमातून तुम्ही स्मार्टफोनमधल्या कोणत्याही अॅपला लॉक करु शकता. 

स्मार्ट अॅपलॉक

हा अॅपलॉक 31 भाषांना सपोर्ट करतो. या अॅपच्या मदतीनं तुम्ही होम स्क्रीन, गॅलरी, इमेलबरोबरच इन्स्टॉल केलेल्या अॅपनाही पासवर्ड लावता येतो. 

परफेक्ट अॅप लॉकर

हे अॅप डाऊनलोड केल्यानंतर तुम्ही पिन, पॅटर्न किंवा जेस्चरचा उपयोग करून स्मार्टफोन लॉक करू शकता. तसंच या अॅपमुळे तुम्ही वायफाय, 3G डेटा, ब्ल्यूटूथ ही अॅपही लॉक करता येतात.