नेटवर्क नसतानाही करा कॉल

मोबाईलमध्ये नेटवर्क नसल्यामुळे अनेकवेळा महत्त्वाचे कॉल करता येत नाहीत. पण आता यावरही तोडगा निघाला आहे.

Updated: Jan 31, 2016, 08:16 PM IST
नेटवर्क नसतानाही करा कॉल title=

मुंबई: मोबाईलमध्ये नेटवर्क नसल्यामुळे अनेकवेळा महत्त्वाचे कॉल करता येत नाहीत. पण आता यावरही तोडगा निघाला आहे. मोबाईलचं नेटवर्क नसतानाही आता तुम्हाला फोन करता शक्य होणार आहे.
लिबोन ऍपच्या माध्यमातून तुमची ही समस्या दूर होऊ शकते. या ऍपचनं नवीन फिचर रिच मी मुळे तुम्ही नेटवर्कमध्ये नसतानाही कॉल करु शकता, इतकच नाही तर या ऍपमुळे तुम्हाला कॉल रिसिव्ह करणं ही शक्य होणार आहे.

 
वायफायच्या मदतीनं याचा वापर करता येणार आहे. तुमचं वायफाय ऑन असल्यास फोनमध्ये नेटवर्क नसतानाही तुम्ही कॉल करु शकता. हे सगळे कॉल तुमच्या मोबाईल नंबरवरुनच जातील.

लिबन ऍपवरुन कॉल करण्यासाठी दुसऱ्याच्या मोबाईलमध्ये लिबन ऍप असायची गरज नाही. या ऍपच्या माध्यमातून तुम्ही भारत, अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया यासारख्या 100 देशांमध्ये कॉल करु शकता.