'ऑटोमॅटिक ट्रान्समिशन'सहीत महिंद्राची XUV 500

महिंद्रा अॅन्ड महिंद्रानं आपली एक नवी कोरी प्रीमियम स्पोर्टस युटिलिटी व्हेईकल 'एक्सयूव्ही ५००' लॉन्च केलीय. 'ऑटोमॅटिक ट्रान्समिशन' हे या गाडीचं वैशिष्ट्य ठरलंय. 

Updated: Nov 26, 2015, 12:05 PM IST
'ऑटोमॅटिक ट्रान्समिशन'सहीत महिंद्राची XUV 500 title=

नवी दिल्ली : महिंद्रा अॅन्ड महिंद्रानं आपली एक नवी कोरी प्रीमियम स्पोर्टस युटिलिटी व्हेईकल 'एक्सयूव्ही ५००' लॉन्च केलीय. 'ऑटोमॅटिक ट्रान्समिशन' हे या गाडीचं वैशिष्ट्य ठरलंय. 

कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, ऑटोमॅटिक एक्सयूव्ही ५०० ही गाडी ५ डिसेंबरपासून महिंद्राच्या सर्वच डिलर्सकडे विक्रीसाठी उपलब्ध असेल. 

महिंद्रा अॅन्ड महिंद्राचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक्सयूव्ही ५०० नं अगोदरच अनेक नवनवीन तंत्रज्ञान सर्वात अगोदर समोर आणलेत आणि एक्सयूव्ही ५०० ऑटोमॅटिकदेखील ग्राहकांना अनेक नवीन अनुभव देऊ शकेल.  

याआधी, कंपनीनं एक्सयूव्ही ५०० ही गाडी २०११ मध्ये लॉन्च केली होती. हे नवीन व्हर्जन लॉन्च करण्याअगोदर आत्तापर्यंत जवळपास दीड लाख गाड्या विकल्या गेल्यात. 

या गाडीची मुंबईतील शोरुममध्ये कमीत कमी किंमत आहे १५.३६ लाख रुपये.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.