मुंबई : सध्या कम्प्युटरचा बाजार अॅपल आणि मायक्रोसॉफ्टने काबीज केला आहे. तुम्ही अपलचा MAC सिस्टिम निवडा किंवा पर्सनल कम्प्युटर (PC) निवडा या दोघांचे फायदे आहे. Mac आणि PC मध्ये कन्फ्युजन असेल तर तुमच्यासाठी खास टीप्स
ऑपरेटिंग सिस्टिम
MAC ची ऑपरेटिंग सिस्टिम ही पीसीपेक्षा खूपच वेगळी असते. अपलचा कम्प्युटर Mac OS वर चालतो. पीसी विंडोजवर चालतो. Mac OS जास्त सक्षम आहे. त्यात एररची शक्यता कमी आहे. विंडोज सिस्टिममध्ये सर्विस पॅक असतो, ज्यामुळे सिस्टिम परफॉर्मेन्स सुधारण्यासाठी अपडेट होणे गरजेचे असते. पीसी लाइनक्स, यूनिक्स आणि इतर ऑपरेटिंग सिस्टिमवर चालतो.
अॅप्लीकेशन
विंडोजमध्ये अॅप्लीकेशन्स जास्त उपलब्ध आहेत. हे आपण नाकारू शकत नाही. दरम्यान काही असे सॉफ्टवेअर आहेत त्याचा वापर करून आपण दोन्ही सिस्टिममध्ये करू शकतो. MACमधील सॉफ्टवेअर जास्त प्रभावी आहेत. इमेज आणि व्हिडियो प्रोसेसिंगच्या फिल्डमध्ये सामान्यतः MAC ला प्राथमिकता दिली जाते. यावरून आपण हा निष्कर्ष काढू शकतो की तुम्हांला अधिक सुविधा पाहिजे असेल तर तुम्ही पीसी विकत घ्या, तर सक्षम आणि फास्ट कम्प्युटर पाहिजे असेल तर MAC ची निवड करा.
सिक्युरिटी
या बाबतीत MACच्या मालकाला जास्त चिंता करण्याची गरज नाही. पीसीवर मालवेअर अटॅकचा धोका जास्त असतो. तुमच्या पीसीवर इंटरनेटचा वापर करत असाल तर अपडेटेड एन्टी व्हायरस जरूर इन्स्टॉल करा. जगातील ९० टक्के बाजारावर पीसीने काबीज केला आहे. त्यामुळे विंडोजवर चालत असलेल्या पीसीवर हॅकिंगचा धोका अधिक आहे.
किंमत
सहाजिकच MAC ची किंमत अधिक आहे. ही वाढीव किंमत अपलच्या मार्केटिंग पॉलिसीमुळेही आहे. तसेच MAC ची क्षमतेमुळेही किंमत वाढते. पीसी या बाबतीत खूप स्वस्त आहे.
एसेसरीज आणि डिझाइन
पीसी हा कस्टमाइज करता येतो. त्याला जास्त युजर्स प्राथमिकता देतात. तुम्ही पीसीवर अनेक कंपोनंट जोडू शकतात. त्याबरोबर सहजतेने अनइन्स्टॉल करू शकतात. परंतु MACची एसेसरीज अपल कंपनीच बनवते. यात कपॅटिबिलिटीचा मोठा प्रॉब्लेम आहे. डिझाइनच्या बाबतीत MAC सिस्टिम स्टाइलिश आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.